खांबा येथील घटना : आईवडिलांना एकुलतीसाकोली : आजीसोबत जंगलात काड्या आणण्यासाठी गेलेल्या नातीनचा तलावात बुडून मृत्यू झाला. ही घटना साकोली तालुक्यातील खांबा जांभळी येथे आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास उघडकिला आली. खुशबू यादव लांजेवार (१२) रा. खांबाअसे मृत मुलीचे नाव आहे.आज सकाळी खुशबू ही आजी व भावासह जंगलात काड््या आणण्यासाठी गेली होती. काड्या गोाळा केल्यानंतर आजीने खुशबूच्या डोक्यावर लहान काड्यांची मोळी देऊन तीला घरी जाण्यास सांगितले. तीची आजी व खुशबूचा भाऊ जंगलात काड्या गोळा करीत होते. यादरम्यान खुशबू मोळी घेवून घराकडे न जाता तलावाच्या दिशेने गेली. तलावात खुशबूला कमळाचे फुल दिसले. त्यामुळे ती तलावात कमळाचे फुल तोडायला पाण्यात उतरली. तीला पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून करूण अंत झाला. बऱ्याच वेळानंतर खुशबूची आजी व भाऊ घरी आले. तेव्हा खुशबूच्या आई-वडीलांनी खुशबूबाबत विचारपूस केली. ती घरी न परतल्याने जंगलाच्या दिशेने जाऊन तिचा शोध घेण्यात आला. यात तलावात खशबूचे प्रेत तलावात तरंगताना आढळला.घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस ताफा घटनास्थळी पोहचला. खुशबूचा मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आला. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे आणण्यात आले. खुशबू ही लोकसेवा विद्यालय कोसमतोंडी या शाळेत इयत्ता सहाव्या वर्गात शिकत होती. खुशबू ही आईवडीलांना एकुलती होती. (तालुका प्रतिनिधी)
तलावात बुडून मुलीचा मृत्यू
By admin | Published: November 04, 2016 12:51 AM