भंडारा : जिल्ह्यात दररोज पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, रविवारी नव्याने ८४४ रुग्णांची भर पडली. दोन दिवसातील हा आकडा सर्वाधिक आहे. कोरोनाने एकाचा मृत्यू झाला. आता कोरोनाबळींची संख्या ३५२ झाली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २० हजार ८६१ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या असून, त्यापैकी १५ हजार ५३० व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या, तर ४९७९ व्यक्ती उपचाराखाली आहेत. गत वीस दिवसांपासून दररोज कोरोना रुग्णांची संख्या चढत्या क्रमाने वाढत आहे. शुक्रवारी २२०३ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ३६२, मोहाडी १४२, तुमसर ७३, पवनी ११६, लाखनी ७९, साकोली ३१ आणि लाखांदूर तालुक्यात ४१ असे ८४४ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. भंडारा तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ९०६१ झाली असून, मोहाडी १७१४, तुमसर २६१७, पवनी २३३०, लाखनी २१९६, साकोली २०९८, लाखांदूर ८४५ झाली आहे. आतापर्यंत दोन लाख एक हजार ६४ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात २० हजार ८६१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.४४, तर जिल्ह्याचा मृत्युदर ०१.६८ टक्के एवढा आहे.