लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : भंडारा-वरठी राज्य महामार्ग हा अतंत्य वर्दळीचा महामार्ग आहे. जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन व पोलाद कारखाना असल्यामुळे या रस्त्यावरून २४ तास वाहनांची रहदारी सुरु राहाते. रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे हे वाहन चालकाकरिता त्रासदायक ठरत आहेत.रस्त्यावर ठिकठिकाणाहून डांबर उखडलेले आहे. रस्ता दुभाजक तयार करताना झालेला अव्यवस्थितपणा हा अपघाताला आमंत्रण देते. दरम्यान रात्री रस्त्यावर आडवे येणारे रानडुक्कर धोकादायक आहेत.राज्य व केंद्र शासनाचे गाव तेथे रास्ता हे ब्रीद वाक्य आहे. त्यानुसार रस्ते तयार करण्यात आले. पण रस्त्याचा दर्जा एकदम खालच्या स्तराचा आहे.वरठी - भांडारा या दहा किमी अंतराच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यावर पडणारे खड्डे नियमित बाब आहे. पण या रस्त्यावर पडलेले खड्डे हे रास्ता बांधकामात झालेल्या गैरप्रकाराची साक्षात पुरावे आहेत.रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यात साचणारे पावसाचे पाणी अपघाताला कारणीभूत ठरत आहेत. अनेक भागातून रस्त्यावर टाकण्यात आलेले डांबर उखडले आहे. ठिकठिकाणी पडलेले खड्ड्याना डबक्याचे स्वरूप आले आहे. या रस्तावरुन वाहन चालवणे म्हणजे चंद्रावर स्वारी करण्यासारखे आहे. वाहन चालकांना उद्या मारत वाहन चालवावे लागते.वरठी येथे जिल्ह्याचे रेल्वे स्टेशन व पोलाद कारखाना आहे. यामुळे दिवस रात्र या रस्त्यावरून रहदारी सुरु राहते. सदर राज्यमार्ग तुमसर मार्ग असल्यामुळे महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यांना जोडणारा मार्ग आहे. यामुळे रहदारी मोठ्या प्रमाणात होते.पण रस्त्याची वाईट अवस्था ही अपघाताला कारण ठरत आहे. वरठीचे स्मशान घाट ते सिरसी फाटा पर्यंतच्या रस्त्यावर पडलेले खड्डे मृत्यूला आमंत्रण देणारे आहे. खोल व अरुंद पडलेले खड्डे रात्री किंवा पावसाच्या वेळी लक्षात येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार सहज अपघाताला बळी पडत असतात. जगनाडे चौकातील वळण मार्गावर संपूर्ण रास्ता उखडलेले आहे. त्यामुळे वळण घेणारे वाहन अपघातग्रस्त होतात.वर्षभरात ९ बळी व ४३ जखमीवरठी-भंडारा राज्यमार्गावर २०१७ ते जून २०१८ या कालावधीत १२ मोठे अपघात झाले आहे. यात ९ जणांचा मृत्यू व ३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. यात ९ पुरुष १९ महिला व २ मुलांचा समावेश आहे. शुल्लक अपघातात १२ जखमींची नोंद आहे. सदर आकडे हे पोलीस स्टेशन वरठी येथे दाखल झालेल्या गुन्हे नोंदवहीतील आहेत. अनेक अपघाताची तक्रार न नोंदवल्यामुळे अपघाताची संख्या कळली नाही. पण या रस्त्यावर होणारे अपघात हे मोठ्या प्रमाणात असून गत सहा महिन्यात ३५ च्या वर छोटे अपघात झाले आहेत. यात दुचाकीस्वारांची संख्या जास्त आहे. अपघाताला मुख्य कारण म्हणजे खड्डे आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका सामान्य लोकांना जीव गमावून करावा लागत आहे.रस्ता दुभाजक अव्यवस्थितवरठी-भंडारा राज्यमार्ग तयार करताना ये-जा करण्यासाठी रस्त्याच्या मधातून दोन भागात विभागणी करण्यात आली आहे. पण हि विभागणी शास्त्रीय पद्धतीने करण्यात आली नाही. मधातून विभागलेले भाग उंच असून सामान पातळी नसल्यामुळे रस्ता ओलंडणारे वाहन सहज कोसळते. दुभाजक म्हणून केलेले दोन्ही भागात वाहन चालकांना सहजासहजी येता जाता येत नाही. एका बाजूला उंच व दुसरीकडे खोल अशी अवस्था आहे. यामुळे रस्त्यावरून धावणारे वाहन स्लीप होतात आणि अपघाताला समोर जातात. यात दुचाकी स्वारासह मोठ्या वाहनांचा समावेश आहे.
भंडारा-वरठी राज्यमार्ग ठरतोय मृत्यू मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 12:58 AM
भंडारा-वरठी राज्य महामार्ग हा अतंत्य वर्दळीचा महामार्ग आहे. जिल्ह्याचे प्रमुख रेल्वे स्टेशन व पोलाद कारखाना असल्यामुळे या रस्त्यावरून २४ तास वाहनांची रहदारी सुरु राहाते. रस्त्यावर पडलेले असंख्य खड्डे हे वाहन चालकाकरिता त्रासदायक ठरत आहेत.
ठळक मुद्देखड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष, रस्त्याचे कठडेही धोकादायक