लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात तुमसर तालुक्याच्या बपेरा परिसरातील आरोग्य सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. आंग्ल रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने नागरिकांत रोष आहे. या भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी दिला आहे.बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात विविध गावात मूलभूत सुविधांचा अभाव आहे. बपेरा येथे असलेल्या आंग्ल दवाखान्यात संतापजनक प्रकार निदर्शनास येतात. या दवाखान्यात कार्यरत वैद्यकीय अधिकारी दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांच्या जागेवर कुणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. येथे असलेला औषध निर्माता केवळ गोळ्या वितरणाचे काम करतो. त्यामुळे येथील रुग्ण मध्यप्रदेशात धाव घेतात. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नागरिकांना नाहक आर्थिक भार सहन करावा लागतो. विशेष म्हणजे लाखो रुपये खर्च करून येथे आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र त्याचा उपयोग होत नाही. याबाबत वारंवार निवेदने देण्यात आली. परंतु कुणीही दखल घेतली नाही. आता या प्रकरणी प्रशासनाने दखल घेतली नाही तर रस्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बपेरा गावात श्रेणी एक चा पशुवैद्यकीय दवाखाना आहे. मात्र इमारतीचा प्रश्न कायम असल्याने सध्या समाजमंदिरात जनावरांवर उपचार केले जातात.
सीमावर्ती भागात आरोग्य सेवेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 9:46 PM
मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागात तुमसर तालुक्याच्या बपेरा परिसरातील आरोग्य सेवेचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे. आंग्ल रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने नागरिकांत रोष आहे. या भागात आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही तर रास्ता रोको करण्याचा इशारा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी दिला आहे.
ठळक मुद्देडॉक्टरांचे पद रिक्त : नागरिकांचा रास्ता रोकोचा इशारा