लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर तालुक्यातील ६७ गावातील २३ हजार २६४ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज सादर केले. त्यापैकी केवळ २१६ शेतकºयांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकºयांना कर्जमाफीची प्रतीक्षा असून मोठा त्रास सहन करून शेतकºयांनी आॅनलाईन अर्ज भरता होता. धान उत्पादक शेतकºयांवर अस्मानी तथा सुलतानी संकट कोसळले आहे.आपले सरकार या संकेतस्थावर आॅनलाईन पद्धतीने कर्जमाफीचे अर्ज सादर केले होते. तुमसर तालुक्यातील ९७ गावातील २३ हजार २६४ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज सादर केले. यात आलेसूर १६९, आंबागड ४९९, आसलपानी २१९, आष्टी ६१६, बाळापूर ९, बाम्हणी १८०, बपेरा आ. २०८, बपेरा सि. २७०, बिनाखी २४४, बोरगाव १७९, बोरी ६३, ब्राम्हणटोला १, चांदपूर ११६, चारगाव ८६, दावेझरी सि. १८४, देवरीदेव १९८, देव्हाडी १५०, देवनारा १९४, देवसर्रा १४६, धनेगाव १६२, डोंगरी बु. २७८, डोंगरला ३७०, गर्रा बघेडा ५९०, धुटेरा २३५, गोबरवाही १७२, गोंदेखारी २२७, गोंडीटोला १७४, गुडरी खुर्द ११२, हरदोली आं. २४०, हरदोली सि. २९४, हसारा २२६, हिंगणा ३०७, कर्कापूर ४२२, कवलेवाडा २६६, खैरलांजी १०८, खापा २९७, खरबी ४२०, कोष्टी ९१, कुरमुडा ६७, लेंडेझरी १२४, लोभी ३५१, लोहारा ४२३, मच्छेरा १५४, मांडवी १६५, महालगाव २२५, मांडवी २३०, मांढळ ३४५, मेहगाव १७३, मिटेवानी ४६६, खापा मो. २६२, मोहगाव ख. ३११, मुरली १८०, नाकाडोंगरी २०८, नवरगाव ७५, पचारा ८१, पांजरा २०२, परसवाडा सि. २५०, परसवाडा दे. १८५, पाथरी २७६, पवनारा २२२, पवनारखारी १२८, पिपरा २४१, पिपरीचुन्ही २५२, पिटेसूर १९२,राजापूर १४१, रनेरा १४१, रोंघा १६५, रूपेरा १९६, साखळी २५०, सिहोरा ४६८, सिलेगाव ३७९, सिंदपूरी २९५, सितासावंगी ७६, सितेपार १२५, सोंड्या ६९, सोनेगाव २७३, सोरना २६२, स्टेशनटोली १०, सुकळी दे. ३३७, सुकळी नकुल २६०, तामसवाडी ४, तामसवाडी सि. ३०८, टेमनी २७५, ढोरवाडा १६१, तुडका ६४, तुमसर १०६८, उमरवाडा १६९, वाहनी २६७, वारपिंडकेपार १५४, येदरबुची १३५, येरली ६७२, झारली १४९ शासनामार्फत कर्जमाफीचा लाभ मिळाल्यांची प्राथमिक यादी संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली. त्या यादीत फक्त २१६ शेतकºयांचीच कर्जमाफी झाली असल्याचे दिसून आले आहे.शासनाच्या निर्देशानुसार कर्जमाफीचा लाभाकरिता शेतकºयांनी विविध अर्ज भरून शासनाला माहिती पाठविली.तरी पहिल्या यादीत अर्ज सादर केलेल्यापैकी निम्मा शेतकºयांना तरी लाभ मिळायला पाहिजे होता. आॅनलाईन प्रक्रियेत तांत्रिक बिघाड आल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. कर्जबाजारी शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षेत येथे दिसत आहे.
२३,२६४ पैकी २१६ शेतकºयांना कर्जमाफी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 11:36 PM
तुमसर तालुक्यातील ६७ गावातील २३ हजार २६४ शेतकºयांनी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज सादर केले.
ठळक मुद्देउर्वरित शेतकºयांना प्रतीक्षा : तुमसर तालुक्यातील कर्जबाजारी शेतकºयांची व्यथा