आॅनलाईन लोकमतभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५३ हजार १११ शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश करण्यात आला असून २० हजार ५०० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यात २० हजार ५०० शतेकरी कर्जमाफी अंतर्गत दोन हजार १९६ शेतकºयांना ‘वन टाईम सेटलमेंट’ लाभ मिळणार आहे. ३० हजार ४१५ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यात ४१ लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाने १९ हजार कोटी रूपयांची रक्कम बँकांकडे वर्ग केली. या योजनेंतर्गत राज्यभरात ७७ लाख अर्ज प्राप्त झाले होते. ंअर्जाच्या छानणीअंती कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली. जे शेतकरी पात्र होते परंतु अर्ज केले नाही अशा शेतकऱ्यांनाही या योजनेत सामावून घेण्यात येणार आहे.या योजनेंतर्गत शेतकरी कुटुंबाचे दीड लाख रूपयांपर्यतचे कर्ज माफ करणे, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपयांपर्यत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. कर्जाचे पुनर्गठन झालेल्या शेतकऱ्यांना योजनेत सामावून घेण्यात आले. जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँकांवर कर्जमाफीची रक्कम वितरणाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्ज माफ झाल्यामुळे कर्जाचा भार हलका झाला. कर्जमाफीमुळे दिलासा मिळाल्याचे सांगत पिसाराम चोपकर, रा.सिल्ली, राजू नरडंगे रा.डोडमाझरी, रवी पुडके रा.पांढराबोडी, मंगल भोतमांगे रा.आमगाव यांनी राज्य सरकारचे आभार मानले आहे.
५३,१११ शेतकऱ्यांना मिळाला कर्जमाफीचा लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:22 AM
आॅनलाईन लोकमतभंडारा : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना कर्जमाफी अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील ५३ हजार १११ शेतकऱ्यांचा ग्रीन यादीत समावेश करण्यात आला असून २० हजार ५०० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यात २० हजार ५०० शतेकरी कर्जमाफी अंतर्गत दोन हजार १९६ शेतकºयांना ‘वन टाईम सेटलमेंट’ लाभ मिळणार आहे. ३० हजार ...
ठळक मुद्देशिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : ३०,४१५ शेतकºयांना प्रोत्साहनपर अनुदान मंजूर