लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेचा फज्जा उडाला आहे. सन १९५२ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे घेतली होती हे विशेष.देव्हाडी तुमसर रोड येथे बाजार चौकात ब्रिटीशकालीन विस्तीर्ण रेल्वेच्या मालकीचा तलाव आहे. मागील तीन वर्षापासून तलावाची दूरावस्था झाली आहे. तलावात जलपर्णी वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढली असून सर्वत्र जलपर्णीची मोठी पाने पसरली आहेत. संपूर्ण तलावच जलपर्णीच्या विळख्यात गेला आहे. तलावात कचरा सुद्धा पडून आहे. येथील जीव जलपर्णीमुळे धोक्यात आले आहे. इतकी जलपर्णी वनस्पती तलावात आहे.सन १९५२ मध्ये राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडारा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविली होती. दरम्यान डॉ. बाबासाहेबांची जंगी प्रचारसभा याच तलावाच्या रिकाम्या जागेत घेतली होती. ही आठवण व तिचे महात्म्य आजही आहे.बाबासाहेबांच्या पदस्पर्धाने हा तलाव पावन झाला आहे. तलावावर रेतीची मालकी आहे. रेल्वे प्रशासनाने २५ मार्च रोजी तलाव स्वच्छता आणि गाळी, मासेमारी करिता निविदा प्रकाशित केली आहे. पाच वर्षाकरिता हा तलाव लिलाव करण्याचा निर्णय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय अभियंत्यांनी काढला आहे. तलावाच्या शेजारीच रेल्वेचे कार्यालय व विभागीय अभियंत्यांची सदनिका आहे.तलावाच्या काठावरून तुडका व स्टेशनटोली गावाकडे जाणारा रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपी जंगल तयार झाले आहे. वळणमार्ग वाहन धारकांकरिता धोकादायक ठरला आहे. तीन वर्षापुर्वी या रस्त्यावर एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. समोरचे वाहन येथे दिसत नाही.रेल्वे प्रशासन स्वच्छ भारत अभियान एक कदम स्वच्छता की ओर असे घोषवाक्य तयार करून मोठा गाजावाजा स्वच्छतेचा करीत आहे, परंतु प्रत्यक्षात येथे दिव्याखाली अंधार दिसत आहे. ऐतिहासिक तलावामध्ये पुनरूज्जीवन करण्याकरिता रेल्वे प्रशासनाने गंभीरतेने दखल घेण्याची गरज आहे.ऐतिहासिक महत्त्व व डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तलावाची दुरवस्थेला रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. स्वच्छ भारत अभियानाचा विसर रेल्वे प्रशासनाला पडला आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार करणार आहे.-डॉ. पंकज कारेमोरे, तुमसर.
देव्हाडीतील रेल्वे तलावाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:43 PM
भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे. परंतु जिल्ह्यातील तलावांची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. देव्हाडी येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रेल्वे तलावाची सध्या दुरवस्था झाली आहे. स्वच्छ भारत अभियान योजनेचा फज्जा उडाला आहे. सन १९५२ च्या लोकसभा निवडणुकीची प्रचारसभा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी येथे घेतली होती हे विशेष.
ठळक मुद्देतलवाला ऐतिहासिक महत्त्व : जलपर्णी वनस्पतीचा वेढा, माशांचा जीव धोक्यात