ग्रामपंचायत सावरीच्या सरपंच संजीवनी नान्हे व उपसरपंच सचिन बागडे यांनी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, जिल्हाधिकारी भंडारा व तहसीलदार मल्लिक विरानी यांना पत्र देऊन भारतीय स्टेट बँकेची शाखा बंद करण्याचा विरोध केला आहे. सदर भारतीय स्टेट बँकेच्या शाखेमुळे सावरी, मुरमाडी, सोमलवाडा, मेंढा, दैतमांगली, रेंगेपार (कोठा) सोनेखारी, खेडेपार, केसलवाडा (वाघ) येथील लोकांची सोय होत असते. परिसरातील अनेक शासकीय, निमशासकीय, खासगी, व्यावसायिक खाती लोकांनी काढलेली आहेत. शाखा बंद झाल्यास लाखनी शाखेवरील ताण वाढेल म्हणून शाखा बंद होऊ नये, अशी परिसरातील लोकांनी मागणी केली आहे.
कोट
भारतीय स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाखा बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सावरी शाखेत दोन कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यांची संख्या वाढली आहे. परिसरातील लोकांसाठी बँकेच्या व्यवहारासाठी सावरी शाखेची मदत होत असते. जुन्या अहवालावरून शाखा बंद करू नये.
आकाश कोरे, माजी सदस्य, जिल्हा परिषद क्षेत्र, मुरमाडी (सावरी)