शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

पहिल्या दिवशी शाळा बंदचा निर्णय तूर्तास मागे

By admin | Published: June 24, 2017 12:24 AM

मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांमुळे जिल्हा परिषद शिक्षकांनी २७ जूनला शाळा उघडायच्या नाही, असा निर्णय घेतला होता.

जि.प. प्रशासनाचे आश्वासन : आमदार चरण वाघमारे यांनी केली मध्यस्थीलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणांमुळे जिल्हा परिषद शिक्षकांनी २७ जूनला शाळा उघडायच्या नाही, असा निर्णय घेतला होता. मात्र आज आ. चरण वाघमारे यांच्या मध्यस्थीने जिल्हा परिषद प्रशासनाने अशा मागण्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे पहिल्या दिवशी शाळा बंद ठेवण्याचा तिढा आता सुटला आहे. शासकीय विश्रामगृह येथे पार पडलेल्या या बैठकीला आ. वाघमारे यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मातकर, शिक्षणाधिकारी (प्राथ.) मोहन चोले, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते अरविंद भालाधरे, डॉ. उल्हास फडके, भंडारा पंचायत समिती सभापती प्रल्हाद भुरे आदी यावेळी उपस्थित होते. मागील काही महिन्यांपासून शिक्षक संघटनांना केवळ आश्वासने दिली जात होती. मात्र त्यांच्या समस्या निकाली निघाल्या नाही. दरम्यान त्यांनी जिल्हास्तरावर मोठे आंदोलन केले. यावेळी खा. नाना पटोले व आ. चरण वाघमारे यांच्या पुढाकाराने तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांनी आंदोलनस्थळी भेट देवून शिक्षकांच्या समस्या आठ दिवसात सोडविण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर शिक्षकांचे आंदोलन थांबले होते.मात्र त्यानंतर आश्वासना पलिकडे शिक्षकांना काहीही मिळाले नाही. दरम्यान त्यांनी शिक्षक कृती समितीच्या माध्यमातून अनेकदा जि.प. प्रशासनाशी चर्चा करण्यात आली. मात्र त्यांच्या समस्या निकाली निघाल्या नाही. त्यामुळे यावर्षीच्या शैक्षणीक सत्राच्या पहिल्या दिवशीच शाळा उघडायचीच नाही, असा निर्णय शिक्षक कृती समितीने घेतला होता. त्यामुळे प्रशासनाने शिक्षकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या होत्या.शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या तातडीच्या बैठकीत आ. चरण वाघमारे यांनी पुढाकार घेवून शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. दरम्यान त्यांनी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली व जि.प. प्रशासनाने शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचे निर्देश दिले. यावेळी शिक्षक कृती समितीने मिळालेल्या आश्वासनामुळे २७ जूनचे शाळा बंदचे आंदोलन तुर्तास मागे घेण्यात आले आहे. या बैठकीला शिक्षक कृती समितीचे मुबारक सैय्यद, धनंजय बिरणवार, ओमप्रकाश गायधने, ईश्वर नाकाडे, ईश्वर ढेंगे, वसंत साठवणे, जयंत उपाध्य, सुधीर वाघमारे, सुधाकर ब्राम्हणकर, हरकिसन अंबादे, रमेश परधीकार, संदीप वहिले, युवराज वंजारी, मुकूंद ठवकर आदींची उपस्थिती होती.ठवकर यांनी घेतला पुढाकारउपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मंजुषा ठवकर यांनी या महिन्यातच जबाबदारी सांभाळली आहे. दरम्यान शिक्षकांनी शाळा बंदचा इशारा दिल्याचे वृत्त "लोकमत"ने प्रकाशित केल्यानंतर मंजुषा ठवकर यांनी शिक्षण विभागाला निर्देश देऊन शिक्षकांच्या समस्यांची फाईल तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले होते. जिल्हा परिषद शिक्षकांनी प्रलंबित प्रकरणांवर पहिल्या दिवशी शाळा बंदचा इशारा दिला होता. त्यामुळे शाळा बंद न ठेवता त्या सुरू रहाव्या यासाठी प्रयत्नशिल होते. त्यांचे प्रलंबित प्रकरण निकाली काढण्याबाबत शिक्षण विभागाला निर्देश देण्यात आलेले आहे. सर्व प्रलंबित प्रश्न निश्चित तातडीने निकाली निघतील. -मंजुषा ठवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), जि.प. भंडारा.