लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : गत दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने धान पीक पुर्णत: उध्दवस्त होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.भंडारा जिल्हा हा प्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. लागवड क्षेत्राच्या ९० टक्के क्षेत्रात धानाची शेती केली जाते. परंतु गत दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारली. त्यामुळे पºहे पिवळे पडले असून रोवणी झालेल्या शेतातही जमीनीला भेगा पडत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा, या प्रमुख मागणीसाठी गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार मधुकर कुकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नाना पचंबुध्दे, सरचिटणीस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हा कचेरीवर पोहचल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत करावा, या मागणीसोबतच शेतकºयांना धान बीज मोफत द्यावा, सोळा तास वीज पुरवठा करावा, खताचे दर कमी करावे, नवीन वीज कनेक्शन द्यावे, धानाला ३हजार रुपये प्रती क्विंटल भाव द्यावा, इंधन दरवाढ कमी करावी, जिल्ह्यातील प्रकल्पाचे पाणी सोडण्यात यावे, शेतकºयांना पेन्शन लागू करावी आदी मागण्यांचा समावेश होता.या मोर्चात मेहबुब शेख, अभिषेक कारेमोरे, रविकांत सर्पे, सुरज चव्हाण, कल्यानी भुरे, धनेंद्र तुरकर, राजु कारेमोरे, सुरेश रहांगडाले, योगेश सिंगनजुडे, राजकुामर माटे, डॉ. रविंद्र वानखेडे, यशवंत सोनकुसरे, दयानंद नखाते यांच्यासह शेकडो पदाधिकारी सहभागी झाले होते.
जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:17 PM
गत दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने धान पीक पुर्णत: उध्दवस्त होत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारी येथील जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : राष्ट्रवादी काँग्रेसचा पुढाकार