शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
2
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
3
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
4
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
5
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
6
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
7
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
8
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
9
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
10
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी
11
IND vs SA : विक्रमी धावसंख्येसह टीम इंडियाच्या नावे झाला सर्वाधिक शतकांचा खास रेकॉर्ड
12
"रोज उठतात अन्..."; ओ मोठ्या ताई, महासंसद रत्न, कुठलं बी टाकलं होतं? म्हणत चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल
13
केंद्र सरकारनं मणिपूरमध्ये रातोरात पाठले 2000 CAPF जवान, आता कशी आहे जिरीबाम मधील स्थिती?
14
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! हंगामाच्या सुरुवातीलाच धानाला विक्रमी दर, केंद्र सरकारने 'ड्युटी' रद्द केल्याचा परिणाम
15
गौतम अदानी यांची मोठी घोषणा; अमेरिकेत करणार तब्बल ₹ 84 हजार कोटींची गुंतवणूक...
16
अन्... योगी आदित्यनाथांची सभाच रद्द झाली; भाईंदरचे भाषण ऐकविण्याचा प्रयत्न, नागरिक ३ तास ताटकळले
17
"पहिलं बटण दाबा, बाकीची खराब आहेत"; शिंदे गटाच्या कार्यकर्त्याकडून EVM बाबत चुकीचा प्रचार
18
सलग २ सेंच्युरीनंतर भोपळ्यावर भोपळा! Sanju Samson च्या नावे झाला लाजिरवाणा रेकॉर्ड
19
साहेब रिटायर झाल्यानंतर तुमच्याकडे कोण बघणार? अजित पवार म्हणाले,"मलाच आता..."
20
बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल...; उद्धव ठाकरेंची राणे पिता-पुत्रांवर टीका 

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत २० फुटांची घट

By admin | Published: March 11, 2017 12:26 AM

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी १५ ते २० फूटाने घटली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे.

विहिरी, तलाव कोरडे : उपाय योजना व बोअरवेलवर बंदीची गरजकरडी (पालोरा) : मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच भूगर्भातील पाण्याची पातळी १५ ते २० फूटाने घटली आहे. नैसर्गिक जलस्त्रोतांवर त्याचा परिणाम जाणवत आहे. गावातील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्यावर उपाययोजना न झाल्यास, जलसंसाधनाची कामे न झाल्यास परिस्थिती गंभीर वळण घेण्याची शक्यता आहे. ४०० फुटांपर्यंत खोल खोदल्या जाणाऱ्या बोअरवेलवरही प्रतिबंध लावण्यासाठी विचार करावा लागणार आहे. मोहाडी तालुक्यातील करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. या परिसरात सुमारे ३२ हजार हेक्टर आर शेती विविध पिकांखाली आहे. खरीपातील भाताचे पीक घेतल्यानंतर जमीन पडीत राहते. वैनगंगा नदीच्या पूर्वेला जवळपास १ ते ७ किमीच्या क्षेत्रात परिसराचा विस्तार आहे. सुमारे २५ गावांतील ४५ हजार लोकसंख्या या भागात असून शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या भागावर निसर्गाने अन्याय केला आहे. वैनगंगा नदी व विस्तीर्ण जंगलाच्या मध्यभागी परिसर असताना भुगर्भात पाण्याचा साठा अत्यल्प आहे. लहान मोठ्या तलाव व बोड्यांची संख्या अधिक असताना गजबजलेल्या आहेत. अतिक्रमणामुळे तलावातील पाण्याची साठवण क्षमता बेताची आहे. वन्यजीव अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पामुळे जंगलावर आधारित उद्योग बंद झाले आहेत. त्यामुळे बेरोजगारीची भिषण समस्या उभी ठाकली आहे. सिंचनाच्या कोणत्याही सुविधा नसल्याने दरवर्षी कोरड्या दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.यावर्षी खरिपात अत्यल्प पाऊस झाला. त्यामुळे रोवणीची कामे खोळंबली. पुरेसा पाऊस पडला, त्यावेळी धान रोपांचा कालावधी दीड ते दोन महिन्यांनी वाढला. पाऊसाच्या खोळंब्यामुळे परिसरातील शेती रोवणी अभावी पडीत राहिली. मध्यंतरी पडलेला पाऊस शेवटी बेपत्ता झाल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. कर्जाच्या रक्कमेतून मात्र, सक्तीने पीक विम्याची रक्कम कपात करण्यात आली. मागील वर्षी सुध्दा शेतीला दुष्काळाचा फटका बसला. यावर्षी कमी पडलेल्या पावसाचा परिणाम आता सर्वांना सहन करावा लागत आहे. तलाव, बोळ्या मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोरड्या पडल्या. शेतातील विहिरी बरोबर गावातील विहिरी आटल्या. गावासभोवती २५० ते ३०० फुटापर्यंत खोदल्या गेलेल्या तसेच अनिर्बंध पाण्याच्या उपस्यामुळे तर परिस्थिती भिषण झाली आहे. महिलांना ३ ते ४ किंमीवरुन पाणी घरी आणावे लागत आहे. (वार्ताहर)एकात्मिक पाणलोट कार्यक्रम थंडबसत्यातदोन वर्षाअगोदर परिसराला एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमात समाविष्ट करण्यात आले. जलसंसाधनाची कामे करण्याची ग्वाही देण्यात आली. परंतू डीपीआर मंजुरीअभावी कामे रखडली आहेत. वर्षभरातून डिपीआर मंजुरीसाठी वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून सांगण्यात येते. मोठा गाजावाजा करीत पाणलोट सचिवांच्या निवडीसाठी गावागावात ग्रामसभा गाजल्या. वादविवाद झाले. पंरतू कामाना उशिर का होत आहे, याचा जाब शासन प्रशासनाला विचारण्याची व त्यासाठी कठोर भुमिका घेण्याची काळजी घेण्यात आली नाही. परिणाम कामे थंडबस्त्यात पडली आहेत. जलयुक्त शिवार योजनेकडून मोठी अपेक्षाशासनाचा जलसंसाधनाचा साठी तयारी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजनेकडे पाहिले जाते. कोरड्या दुष्काळावर मात करण्यासाठी यावर्षी शासनाचे वतीने परिसरातील गावाचा समावेश जलयुक्त शिवार योजनेसाठी करण्यात आला. जलयुक्त शिवारातून पाण्याच्या नैसर्गिक साठ्यांचे बळकटीकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याशिवाय कृत्रीम तलाव निर्मितीलाही संधी आहे. आवश्यकता आहे ती नागरिकांच्या सुक्ष्म नियोजनाची व आवश्यक गरजांना प्राधान्य देण्याची. त्या दिशेने गावांनी पावले उचलल्यास जलसंसाधनाची मोठी कामे गावात होवून काही प्रमाणात का होईना पाण्याच्या समस्येवर मात करता येणार आहे.