शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"आपण *** मारायची आणि दुसऱ्याचं..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
4
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
5
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
6
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
7
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
8
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
9
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
10
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
11
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
12
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
13
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
14
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
15
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
16
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
17
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
18
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
19
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
20
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला

देहदान हेच श्रेष्ठदान

By admin | Published: April 01, 2017 12:45 AM

जीवन कितीही सुंदर असले तरी, मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे माणसाने जिवंतीपणी परोपकाराची भावना जोपासून मनुष्य धर्माचे पालन केले असले तरी, ....

राजकुमार बडोलेंसह ३५ कार्यकर्त्यांचा संकल्प गोंदिया : जीवन कितीही सुंदर असले तरी, मृत्यू हा अटळ आहे. त्यामुळे माणसाने जिवंतीपणी परोपकाराची भावना जोपासून मनुष्य धर्माचे पालन केले असले तरी, मरणोपरांत अनेकांना जीवन देण्यासाठी देह खर्ची घालने, ही अनुभूती वेगळीच आहे. आज अनेक रु ग्णांना मानवी शरिराच्या अवयवांची आवश्यकता असते. परंतु कधी आर्थीक परिस्थिती तर कधी उपलब्धता नसल्यामुळे रु ग्णांचे वेळेवर उपचार होत नाही. त्यामुळे प्रत्येक मनुष्याने मरणोपरांत देहाचे दान केल्यास निश्चितच मानवी जन्म सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. देहदान हे श्रेष्ठदान आहे, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ते त्यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्त येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयोजित वैद्यकीय महाविद्यालय व पीपल्स रु लर इन्वायरमेंट यांच्या संयुक्तवतीने आयोजित अवयव व देहदान संकल्प शिबिरात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माजी विधान परिषद सदस्य केशवराव मानकर, नगराध्यक्ष अशोक इंगळे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जि.प. च्या पशुसंवर्धन सभापती छाया दसरे, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, भाजपा जिल्हा महामंत्री भाऊराव उके, नामदार बडोले यांच्या पत्नी शारदा बडोले, उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जि.प.चे समाज कल्याण अधिकारी रामटेके, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, न.प. सदस्य भरत क्षत्रिय, जयंत शुक्ला, राहुल जोशी, हिदायत शेख यांच्यासह मोठ्या संख्येत मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना बडोले यांनी, आजघडीला देशात रुग्णांना अनेकदा अवयवांची आवश्यकता असते. मात्र अजुनही या विषयावर जनजागृती न झाल्याने मरणोपरांत देहदानाची संकल्पनाही केवळ संकल्पनाच ठरत आहे. यामुळे अनेकदा मानवी अवयवांच्या तस्करींचे प्रकरणही पुढे आले आहे. त्यामुळे प्रत्येकाने मरणोपरांत देहदान करण्याचे आवाहनही त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. यावेळी विनोद अग्रवाल, डॉ. केविलया, केशवराव मानकर यांनी या विषयावर समायोचित विचार व्यक्त केले. विशेष म्हणजे स्वत: नामदार बडोलेंसह ३५ नागरिकांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मरणोपरांत देहदान करण्याचा संकल्प घेतला आहे. संचालन धनजंय वैद्य यांनी केले. आभार बसंत गणवीर यांनी मानले. कार्यक्रमासाठी महेश ठवरे, बागळे, अंजू वैद्य, निलिमा पुरी, पोर्णिमा गोंडाने, योगेश राऊत, संदीप डोंगरे, गौतम गणवीर यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)