प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, जिल्हा परिषदेचे मुख्या कार्यकारी अधिकारी विनयकुमार मुन, नाबार्डचे संदीप देवगिरकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक संजय बुरडे यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक उपस्थित होते.
एटीएम मोबाइल व्हॅन बँकेची शाखा नसलेल्या दुर्गम भागात जाऊन नागरिकांना जिल्हा बँकेशी पैशाची देवाण-घेवाण करण्यास सहकार्य करणार आहे. व्हॅनसोबत बँकेचा कर्मचारी राहणार असून नागरिकांना खाते उघडणे, कर्ज सुविधेबाबत माहितीही मिळणार आहे. या सुविधेमुळे जिल्हा बँक ही दुर्गम भागातील ग्राहकांपर्यंत पोहोचणार आहे. सध्या एकाच व्हॅनचे लोकार्पण करण्यात आले असून नागरिकांना चांगला प्रतिसाद मिळाला तर आणखी चार व्हॅन सुरू करण्यात येणार असल्याचे नाबार्डचे संदीप देवगिरकर यांनी या वेळी सांगितले.
जिल्हा बँक ही सर्वसामान्य नागरिकांची बँक असून ग्राहकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात जिल्हा बँक नेहमीच अग्रेसर आहे. मोबाइल एटीएम व्हॅनमुळे ही बँक ग्राहकांच्या गावापर्यंत पोहोचणार असून इतर बँकेच्या ग्राहकांनासुद्धा या मोबाइल एटीएम व्हॅनमधील एटीएममधून पैसे काढता येणार आहेत. ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी केले. यापूर्वी जिल्हा बँकेच्या मुख्य सभागृहात जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, सीईओ विनय मुन, नाबार्डचे संदीप देवगिरकर, जिल्हा उपनिबंधक मनोज देशकर यांचा जिल्हा बँकेतर्फे सत्कार करण्यात आला.