वरठी : सार्वजनिक सेवा उपक्रम अंतर्गत वरठी येथे देणगीच्या माध्यमातून मोक्षरथ तयार करण्यात आला आहे. सार्वजनिक उपयोगासाठी सदर मोक्षरथाचे लोकार्पण आमदार राजू कारेमोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून देणगीदार माणिक शहारे, सामाजिक कार्यकर्ते नितीन काकडे, सरपंच श्वेता येळणे, एकलारीच्या सरपंच दशमाबाई गजभिये, पाचगावचे सरपंच संतुलाल गजभिये, बेटाळाचे सरपंच रामसिंग बैस, नेरीचे सरपंच आनंद मलेवार, माजी सरपंच संजय मिरासे, दिलीप गजभिये, डॉ. सुमित मदनकर, उपसरपंच सुमित पाटील, माजी उपसरपंच मनोज सुखाणी, सामाजिक कार्यकर्ते रितेश वासनिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे सुमन मते, हरिभाऊ भाजीपाले, हरिराव वरठे, देवदास डोंगरे, कल्याण डोंगरे, अरविंद येळणे, नवीन पशीने, आदित्य मते, इंदूर सहजसंघाणी, ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, योगेश हटवार, विशाल शेंडे, महादेव मते, चेतन डांगरे, लक्ष्मण पारधी इत्यादी उपस्थित होते. संचालन ग्रामपंचायत सदस्य अतुल भोवते, प्रास्ताविक आदित्य मते व आभार नवीन पशीने यांनी मानले. यावेळी गावातील नागरिक उपस्थित होते.