जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा शहरात वाहतुकीला वळण लागण्याच्या दृष्टीने ट्रॅफिक सिग्नलची व्यवस्था नव्हती. शहरातील प्रमुख चौकांमध्ये लोकांची होत असलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी ही यंत्रणा अत्यंत गरजेची होती.
यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनोद जाधव, वाहतूक पोलीस निरीक्षक शिवाजी कदम, गटनेते विनयमोहन पशिने, शमीम शेख, जुगल भोंगाडे उपस्थित होते. शास्त्री चौकात प्रत्यक्ष उपस्थित राहून या मंडळींनी फीत कापून तर अन्य चौकांमध्ये आभासी पद्धतीने हा कार्यक्रम घेतला गेला. राष्ट्रीय महामार्गावरील जिल्हाधिकारी चौक व शहरातील अन्य प्रमुख चौकांमध्ये ही व्यवस्था उभी करण्यात आली आहे. वाहतुकीला शिस्त यामुळे लागेल. अपघाताचे प्रमाण कमी होऊन लोकांचे प्राण वाचविले जाऊ शकतील. नागरिकांनी या वाहतूक नियमांचे पालन काटेकोर करावे, असे आवाहन यावेळी खासदार सुनील मेंढे यांनी केले.