मोहन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम साहित्यांच्या किंमती वाढल्याने रेल्वे कंत्राटदाराने सहा महिन्यापासून बंद ठेवल्याची माहिती आहे. निवेदेतील किंमती वाढण्याची प्रतीक्षा आहे. रेल्वे कंत्राटदाराने बांधकामाचे साहित्य फाटका शेजारी रस्त्याच्या कडेला ठेवले आहे. सध्या ग्रामस्थ तथा वाहनधारकांना पर्यायी रस्त्याला अडथडा निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने येथे दखल घेण्याची गरज आहे.देव्हाडी येथे रेल्वे उड्डाणपुलाची मंजुरी चार वर्षापूर्वी प्राप्त झाली. राज्य शासन व रेल्वे संयुक्त उड्डाणपूल तयार करीत आहे. राज्य शासनाच्या अखत्यारितील उड्डाणपुलाचे ७५ टक्के काम झाले आहे. रेल्वे फाटकावरील रेल्वे ट्रॅकवरील स्पॅनचे काम करीत आहे. रेल्वेने संबंधित कंत्राटदाराला कामाचे आदेश दिले. दोन्ही बाजुला रेल्वे कंत्राटदाराने कॉलमकरिता खोल खड्ड्यांची कामे केली. त्यानंतर काम बंद केले. काही तांत्रिक कारणामुळे कामे बंद केल्याची माहिती आहे. परंतु लोखंडी साहित्यांच्या किंमती वढल्याने काम बंद केल्याची माहिती पुढे आली आहे.एका वर्षापुर्वी ३३ हजार टन लोखंडाचे भाव होते. सध्या ५२ हजार रूपये टन लोखंडाचे भाव आहे. जीएसटीने पुन्हा भाववाढ झाली. सुमारे ५०० टन लोखंड लागत आहे. रेल्वे येथे ११ कोटींची कामे करीत आहे तर राज्य शासन २४ कोटी रूपये बांधकामावर खर्च करीत आहे. रेल्वे कंत्राटदाराने साहित्य रेल्वे सदनिकेकडे जाणाऱ्या रस्त्याच्या शेजारी ठेवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पोच मार्गाचे काम सोमवारी सुरू केले त्या कामाकरिता रस्ता बंद करावा लागला. रेल्वेचे साहित्यामुळे येथे अडथडा निर्माण झाला आहे. रेल्वे अधिकाºयांचे दुर्लक्ष दिसत आहे.रेल्वे कंत्राटदाराने रस्त्याशेजारील साहित्य तात्काळ हटवावे. वाहनधारकांना याचा मोठा फटका बसणार आहे. वाहतुक कोंडी निर्माण होईल. असंतोषाचा भडका उडण्याची शक्यता आहे. तहसीलदारांनी प्रत्यक्ष कारवाई करावी.- विपील कुंभारे, महासचिवभंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी.
देव्हाडीतील उड्डाणपुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 9:43 PM
देव्हाडी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम साहित्यांच्या किंमती वाढल्याने रेल्वे कंत्राटदाराने सहा महिन्यापासून बंद ठेवल्याची माहिती आहे. निवेदेतील किंमती वाढण्याची प्रतीक्षा आहे. रेल्वे कंत्राटदाराने बांधकामाचे साहित्य फाटका शेजारी रस्त्याच्या कडेला ठेवले आहे. सध्या ग्रामस्थ तथा वाहनधारकांना पर्यायी रस्त्याला अडथडा निर्माण झाला आहे. रेल्वे प्रशासनाने येथे दखल घेण्याची गरज आहे.
ठळक मुद्देसाहित्यांची किंमत वाढली : रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष, ३५ कोटींचा पूल