कोरोनामुळे होणारा त्रास कमी होण्यासाठी ग्रामीण भागात गावठी उपायांवर भर दिला जात आहे. सकाळी झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत घरीच तयार केलेल्या वनौषधांची मात्रा घेतली जात आहे. सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोणी मिठाच्या कोमट पाण्याच्या गुळण्या करतो, कुणी काढा घेतो. हे चित्र आता ग्रामीण भागात पहायला मिळू लागलं आहे. काहीजण मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानंतर गुळवेल (अमृतवेल) चा काढा पित आहेत. गुळवेलची मात्रा लागू झाल्याचे सांगत आहेत. अनेकांनी साखरेऐवजी गुळाच्या चहाला पसंती दिली आहे. याचे किती फायदे अन् किती तोटे माहीत नाही मात्र गुळाचा चहा पिणे सुरू झाले आहे. संध्याकाळी देशी गाईच्या गरम दुधात हळद, लवंग, मिरेपूड टाकून पिण्यावर भर दिला जात आहे. सध्या अनेकांना याचे अनेक फायदे सांगितले जात आहे. याशिवाय अनेक मंडळी सोशल मीडियावर येणारे उपाय करताना दिसत आहे.
बॉक्स
गुळवेल ठरतेय अमृतवेल
निंबाच्या झाडाला वेटोळा घालत वरती जाणारी वेल म्हणजे गुळवेल, अनेक वर्षापासून शेत अनेक झाडावर असलेली ही अमृतवेली औषधासाठी वापरली जाईल, असे कुणाला वाटत नव्हते; मात्र कोरोनाच्या काळात गुळवेलचे महत्त्व चांगलेच वाढले आहे. गुळवेलच्या काड्या, निबाच्या काड्या, तुळशीची पाने, जांभळीची कोवळी पाने व अद्रक एकत्रित बारीक केले जाते. ते रात्र पाण्यात टाकले जाते व सकाळी शिजवून चाळणीने गाळले जाते व ते बाटलीत भरून ठेवले जाते.
बॉक्स
याचा अंमल होतोय.
दररोज सकाळी अर्धा कप पितात. शेणाच्या गोवरीच्या विस्तवावर हळद व ओवा टाकून त्याचा धूरही घेतला जात आहे. हा धूर फुफुफ्सापर्यंत जाण्यासाठी वापारा ओढला जातो असं सांगितलं जात आहे. यातच हुलग्याचे माडगे खाल्ले तर शुगर असलेल्यांना चांगले आहे, असे सांगितल्याने आता चुलीवर माडगेही शिजू लागले आहे. संध्याकाळी देशी गायीच्या गरम दुधात हळद, लवंग, मिरपूड टाकून पिण्यावर भर दिला जात आहे. याचे अनेक फायदे सांगितले जात आहेत.
कोट
कोरोना रुग्णांच्या रक्तात गुठळ्या तयार होतात. तीव्र स्वरुपाचा ताप येतो. रोगप्रतिकार क्षमता मजबूत करण्यासाठी आयुर्वेदिक औषधे उपयुक्त ठरत आहेत. हळद, दालचिणी, सुंठ व गुळवेलचा काढा दिवसातून दोन वेळा घ्यावा, चार बदाम, दोन अंजीर, दोन अक्रोड व मनुके खावेत. कफ नसेल त्यांनी दूध व हळद टाकून प्यावी.
-डॉ. विश्वनाथ नागदेवे, भंडारा.