शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

बांधकाम कामगारांना योजनांचा लाभ देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:55 AM

महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समिती, कामगार आयुक्त, उपायुक्त व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांची संयुक्त बैठक झाली. ...

महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटना कृती समिती, कामगार आयुक्त, उपायुक्त व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव यांची संयुक्त बैठक झाली. यात बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या व प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढून ऑनलाईन नूतनीकरण व अर्ज भरण्याची पद्धत बंद करण्याच्या मागणीवर चर्चा घडवून आणण्यात आली. यावर दोन्ही पक्षांकडून एकमताने मागण्या मंजूर करून तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्णय घेण्यात आला. पण त्यावर कारवाईला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही.

भंडारा व गोंदिया जिल्हा इमारत व इतर बांधकाम असंघटित कामगार संघटनेच्या वतीने सहायक कामगार आयुक्त भंडारा यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यात बांधकाम कामगाराच्या मुलीच्या लग्नासाठी ५० हजार रुपये अनुदान, ३१ डिसेंबर पूर्वी ज्यांनी अर्ज सादर केले अशा कामगारांना पाच हजाराचे अनुदान अदा करणे, कोरोनाच्या प्रादुर्भावाने नूतनीकरण न झाल्यास नूतनीकरण पुनः करून घेणे, बांधकाम कामगाराला घर बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणे अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष शरदचंद्र वासनिक, अध्यक्ष विजय कांबळे, डॉ. विनोद भोयर व रितेश वासनिक व कोषाध्यक्ष आषित बागडे उपस्थित होते.