लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा (कोसरा) : डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट नं. १ च्या समोर कालव्यात पाणी सोडल्यावर नेहमी पाळ फुटते. परिणामी परिसरातील शेतीला धोका निर्माण होतो. पाळ ज्या ठिकाणी फुटत असते तिथे पावसाळ्यापुर्वी सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम धरण विभाग, डावा कालवा वाही यांनी करावे, अशी आजुबाजूच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.सध्या डाव्या कालव्याचे काम इंदिरा सागर धरणापासून १० कि़मी. पर्यंत प्रगतीपथावर आहे. या कालव्याचे १० कि़मी. पर्यंत अस्तरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. यापुढे भांगडिया कंन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम आहे. पण त्यांच्या संथगतीमुळे शेतकºयाना यावर्षी देखिल सिंचनापासून वंचित राहावे लागणार आहे. १० कि़मी. च्या आतमध्ये डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट क्रमांक १ आहे. ही गेट उघडल्यानंतर कालव्याचे पाणी प्रचंड वेगाने सेंद्री, भावड, खैरी गावाकडे जात असते. सोमनाळा गेटच्या अगदी समोरील उजव्या भागात पाण्यामुळे रस्ता उखडतो व डावा कालवा फुटण्याचा प्रकार पावसाळ्यात झाला. मागील पावसाळ्यात गेटच्या समोरची पाळ फूटून कोंढा गावच्या बाजुकडील शेतात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. वेळीच धरण विभाग, वाही यांनी लक्ष देवून डावा कालवा फुटू दिला नाही.चौरास भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जाते. यावेळी डाव्या कालव्यात पाणी सोडावे लागेल. याशिवाय चौरास भागातील धान पिक होऊ शकत नाही. तेव्हा डाव्या कालव्याची पाट सोमनाळा गेटसमोर पक्क्या सिमेंटने बांधण्याची गरज आहे. यासंदर्भात मुख्य अभियंता (डावा कालवा,वाही) यांनी या कामाचे अंदाजपत्रक तयार करून ते काम त्वरित करून घ्यावे, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.
कालव्याची पाळ पावसाळ्यापूर्वी बांधण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 12:46 AM
डाव्या कालव्यावर सोमनाळा गेट नं. १ च्या समोर कालव्यात पाणी सोडल्यावर नेहमी पाळ फुटते. परिणामी परिसरातील शेतीला धोका निर्माण होतो. पाळ ज्या ठिकाणी फुटत असते तिथे पावसाळ्यापुर्वी सिमेंट काँक्रीटचे पक्के बांधकाम धरण विभाग, डावा कालवा वाही यांनी करावे, अशी आजुबाजूच्या शेतकऱ्यांची मागणी आहे.
ठळक मुद्देसोमनाळा गेटसमोरील डावा कालवा : अन्यथा पिकांना बसू शकतो फटका