नाटक, तमाशा गोंधळ भारुड या कलेचे कलावंत प्रत्येक मंचावर विविध कलांचे सादरीकरण करून रसिक प्रेक्षक व श्रोत्यांचे मनोरंजनास प्रबोधनाचे महान कार्य करीत आहेत. कलेच्या सादरीकरणातून जी मिळकत मिळते त्यावरच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असतात.
परंतु मागील वर्षापासून कोरोना या जीवघेण्या आजाराने थैमान घातले असल्याने नाटक, तमाशा, गोंधळ, भारुड, कीर्तन, या सारख्या इतर कलेच्या कलावंतांना शासन निर्णयाचे बंधनकारक अटी, शर्ती नियमांमुळे कला कार्यक्रमाचे सादरीकरण करता आले नाही. त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील पवनी भंडारा लाखनी, लाखांदूर, साकोली, तुमसर, मोहाडी या तालुक्यांसह राज्यातील सर्व जिल्ह्यातील कलावंत आर्थिक विवंचनेच्या चक्रव्यूहात सापडले आहेत. दैनंदिन व्यवहार व कुटुंबाचा सांभाळ कसा करावा कर्ज व उसनवारीची परतफेड कशी करावी आणि मुलांचे शिक्षण व लग्न कसे करावे तसेच वीतभर पोटाची खळगी कशी भरावी, असे अनेक प्रश्न कलावंतांसमोर आवासून उभे ठाकले आहेत. यामुळे सर्व कलाकार, कलावंत चिंतातूर झाले आहेत.
याबाबत शासनाने वेळीच उपाययोजना करून कलाकार, कलावंतांना मदत करण्यासाठी निधीची तरतूद करणे काळाची गरज आहे.
आर्थिक मदत देणारा धोरणात्मक निर्णय घेऊन दिलासा देण्याची मागणी भीमशक्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के.वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हर्षवर्धन हुमने, हरिदास बोरकर अरुण ठवरे, उमाकांत काणेकर, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, मच्छिंद्र टेंभूणे, संदीप बर्वे, सुरेश गेडाम, सुधाकर चव्हाण, दामोधर उके, नत्थू सूर्यवंशी नंदू वाघमारे, जयपाल रामटेके, तोताराम दहीवले, महादेव देशपांडे अरुणा दामले, प पी ता. वंजारी, रूपा लेंधारे, शुभांगी भू तागे, संयोगिता खोब्रागडे, ज्योती मेश्राम, पुष्पा मुल आदींनी केली आहे.