बारदाना संपला असे कारण पुढे करुन दहा दिवस खरेदी बंद ठेवण्यात आली होती. आता पंधरा दिवसांपासून गोडाऊन नसल्याचे कारण सांगून धान खरेदी बंद ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात सर्वत्र भरपूर खरेदी केंद्र आहेत. पण तालुक्यात केवळ आठ खरेदी केंद्र आहेत. आतापर्यंत १० टक्के धान खरेदी झाली आहे. अशा गतीने मोजणी सुरू राहीली तर सर्व शेतकऱ्यांचे धान मोजणे शक्य होणार नाही. खरेदी केंद्र वाढविण्यात यावे. तातडीने खरेदी सुरू करण्यात यावी. दोन दिवसात धान खरेदीचा निर्णय न झाल्यास भारतीय जनता पक्ष पवनी तालुकातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका भाजपने तालुका अध्यक्ष मोहन सुरकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार पवनी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. यावेळी राजेंद्र फुलबांधे, हिरालाल वैद्य, प्रकाश कुर्झेकर, शरद देवाडे, अमोल उराडे ,मश्चिंद्र हटवार, दत्तु मुनरतीवार, सतिस जांभुळकर, धनराज बौबडे, भुशन रांखोडे, खुशाल वंरभे,राजु खांदाडे उपस्थित होते.
आधारभूत धान खरेदी पूर्ववत तातडीने सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:30 AM