पालोरा (चौ ) : पवनी तालुक्यातील बामणी येथील श्रमसाफल्य अभिनव सहकारी संस्था मर्यादा बाह्मणी यांना नव्याने धान्य खरेदी करण्याची पर्वांनगी मिळाली. त्यांनी दि. २ फेब्रुवारीपासून खरेदीचा उद्घाटन समारोह पार पडल्यावर संस्थेच्या प्रमुखाने मोखारा, बाह्मनी, लोणारा, पालोरा, हे चार गाव या संस्थेला जोडले आहे. संबंधित गावातील शेतकऱ्यांनी सातबारा व आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, वरील कगदपत्रे आणून लाइन लावून संस्थेच्या ग्रेडरकडे जमा करावे, असे म्हटले. यामुळे चारही गावांतील शेतकरी संताप व्यक्त करीत आहे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी सांगितले, तसेच नवीन संस्थेला नवीन ७/१२ आणून द्यावे जुने सातबारा चालणार नाही . यामुडे शेतकरीवर्ग तलाठी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर गर्दी लावली आहे, जो आधी सातबारा देणार त्याचा नंबर आधी म्हणून शेतकऱ्यांना पुन्हा लाइनमध्ये लावून भ्रष्टाचार करून आपल्याजवळील लोकांचे नंबर लावण्याचा कट नव्याने सुरू झालेल्या संस्थेने रचला आहे, याआधी जे खरेदी-विक्री पवनी यांच्या केंद्रावर तीन दिवस लाइनमध्ये लागून मिळविण्यासाठी उपाशी रात्र जागून आपल्या सातबारा देऊन टोकन नंबर मिळवला. त्यांना पण चारही गावांची वेगळी यादी बनविण्यात आली. त्यातील काही शेतकऱ्यांचे धान्य मोजून झाले. उर्वरित शेतकऱ्यांचे धान्य यादीप्रमाणे ग्राह्य धरून धान्य मोजन्याचे काटे लावून मोजावे, अशी मागणी शेतकरी सेवक त्र्यंबकेश्वर गिर्हेपूंजे यांच्याह सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शेतकरी बांधवांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही. शेतकऱ्यांनी या श्रमसाफल्य अभिनव सहकारी संस्था मर्याद बाह्मनीवर बहिष्कार करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांकडून नव्याने सातबारासाठी मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2021 5:06 AM