लोकमत न्यूज नेटवर्कजांब (लोहारा) : लोहारा परिसरातील धानपिक तुडतुडा व इतर किडीच्या प्रादुर्भावाने फस्त झाले आहेत. त्या धान पिकाचे चौकशी व त्वरित पंचनामे करण्याची मागणी कृषी विभाग व महसूल विभागाकडे केली आहे.तुमसर तालुक्यातील लोहारा, गायमुख, सोरणा, सोनपुरी, लंजेरा तर मोहाडी तालुक्यातील जांब परिसरात शेतकऱ्यांच्या धानपिकाला मावा, तुडतुडासारख्या अनेक किडीच्या प्रादुर्भावाने पीक फस्त केले. शेकडो एकरातील धानपीक करपले. यावर्षी प्रारंभीला वरूण राजाने दगा दिल्यामुळे लोहारा गायमुख, सोरणा, लंजेरा, धोप, ताळगाव, जांब येथील शेतकºयांची ३० ते ४० टक्के जमिन पडित राहिली. काही शेतकऱ्यांनी पाण्याची जुडवा जुडव करून धानपिकाची लागवड केली असून स्वत:ला सावरण्याचा शेतकºयांनी प्रयत्न केला. परंतु निसर्गाच्या प्रकोपाने धानपिकाला कापणीच्या हंगामात मावा, तुडतुडा सारख्या किडीने हल्ला चढविला. यात शेतकऱ्यांनी सुद्धा प्रतिकार करून नानाविध औषधाची फवारणी करून कीड आटोक्यात आली नाही.धान पिकाची प्रचंड नासधुस झाले. यात बहुतांश शेतकºयांचे पिक करपल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाले आणि उपजिविकेचे कोणतेही साधन ठरले नाही. पिक होईल या आशेने शेतकºयांनी दिवस रात्री एक करून शेतीत राबला परंतु शेवटी निराशा मिळाली. कर्जबाजारीपणाला समोर जावे लागले.अनेक शेतकºयांनी सोसायटी, बँक, जिल्हा बँक वित्तीय संस्था करून पिककर्ज घेतले. प्रत्येक वर्षी पिकविम्याची रक्कम आपल्या जाते व पिक विमा उतरविला पण शेतकºयांना पिक विम्याचा लाभ दिल्या जात नाही. शेतकऱ्याला लागवडीपासून मळणीपर्यंत एकरी १७ हजार खर्च येतो. धानपिक नष्ट झाल्यामुळे शेतकºयांना असाध्य वेदणा सुरू झाल्या की पुढे कसे जीवन जगावे, कर्जाचे परतफेड करायचे कसे या विचारात शेतकरी चिंताग्रस्त दिसून असून शासनाकडे मदतीसाठी हात पसरविले आहेत.लोहारा परिसरातील जवळ जवळ १६० ते २०० शेतकऱ्यांच्या सहीनिशी तहसिलदार तालुका कृषी अधिकारी, आमदार यांच्याकडे निवेदन देवून लोहारा येथील किडीच्या प्रादूर्भावाने लोहारा येथील शेतकरी सुरेंद्र गणपत भागडकर ४ एकर कौशल हरिभाऊ ठाकरे ४ एकर चंद्रभागा दुपारे ४ एकर ताराचंद ठाकरे, शालु इळपाचे १० एकर जनाबाई डोणारकर तीन एकर, शिवदास विठोबा अतकरी दोन एकर अशा अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकाला तुडतुडा रोगाने ग्रासला असून शेतकऱ्यांची मोठी नुकसान झाले आहे. धान पिकाची चौकशी व त्वरित पंचनामे करण्याची मागणी अरविंद ठाकरे, उपसरपंच प्रकाश दुपारे, सुरेंद्र भागडकर, ग्रामपंचायत सदस्य, सुनिल ठाकरे, ग्यानिराम ठाकरे, वसंत तुपटे तसेच लोहारा येथील शेतकºयांनी केली आहे.
लोहारा परिसरातील धानपिकाचे पंचनामे करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2017 9:09 PM
लोहारा परिसरातील धानपिक तुडतुडा व इतर किडीच्या प्रादुर्भावाने फस्त झाले आहेत. त्या धान पिकाचे चौकशी व त्वरित पंचनामे करण्याची मागणी कृषी विभाग व महसूल विभागाकडे केली आहे.
ठळक मुद्देधान पिकावर किडीचा प्रादुर्भाव : शेतकऱ्यांनी केली कृषी विभाग, महसूल विभागाकडे चौकशीची मागणी