अकुशल कामांतर्गत पांदण रस्त्याचे मातीकाम होताना कुशल कामांतर्गत अद्यापही खडीकरण झाले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त होत आहे. पांदण रस्त्यांचे मातीकाम होताना खडीकरण न केल्याने शेतकरी व मजूर जनतेला पावसाळ्याच्या दिवसात शेतीकामासाठी ये-जा करताना, शेती साहित्याची ने-आण करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
राज्यात मग्रारोहयो योजनेची अंमलबजावणी पूर्वकाळात शासनाच्या रोहयो अंतर्गत तालुक्यात जवळपास ७९ पांदण रस्त्यांचे विविध शासकीय यंत्रणे ंअंतर्गत मातीकाम करण्यात आले आहे. मात्र सदर बांधकाम पूर्ण होऊनदेखील या रस्त्यांचे खडीकरण अथवा मजबुतीकरण होण्यासाठी शासनाने या रस्त्यांना ग्रामीण रस्त्यांचा दर्जा देण्याची गरज आहे. पावसाळ्याच्या दिवसात शेतीकामात ट्रॅक्टरचा वापर होऊन मातीकाम पूर्ण पांदण रस्त्यावरील चिखल तालुक्यातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर पसरत असल्याने दरवर्षी तालुक्यातील अनेक रस्ते धोकादायक बनत आहेत. शेतशिवारातील या पांदण रस्त्यांचे खडीकरणाची मागणी मनोहर राऊत यांनी केली आहे.
120821\img-20200821-wa0015.jpg
तालुक्यातील पांदण रस्ता