त्यात पेन्शनर्स शिक्षक, केंद्र प्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यावर सकारात्मक चर्चा झाली. यावेळी भंडारा पंचायत समिती अंतर्गत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचे निवृत्तिवेतन दरमहा एक तारखेस अदा करणे, सातवे वेतन आयोगाचा दुसरा हप्ता अदा करणे, केंद्रप्रमुख यांचा सातवे वेतन आयोगाचा पहिला हप्ता अदा करणे, स्वग्राम भत्ता काढणे, सुधारित अंशराशीकरणाचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव जिल्हा परिषद भंडारा यांना सादर करणे, मार्च २०२० ला वेतनातून कपात करण्यात आलेले २५ टक्के वेतन मिळणे, प्रलंबित वैद्यकीय देयके तात्काळ निकाली काढणे, शासकीय गटविमा नोंद वेळोवेळी घेऊन शासकीय गट विमा देयके अचूक असल्याची खात्री करूनच जिल्हा परिषदेला सादर करणे, २०१६ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना सुधारित पेन्शनचा लाभ देणे आदी विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. मागण्या लवकरच निकाली काढण्यात येतील, असे आश्वासन गटविकास अधिकारी नुतन सावंत यांनी दिले. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष ईश्वरदास ढेंगे, तालुकाध्यक्ष भाष्कर साठवणे, उपाध्यक्ष जयंत उपाध्ये, कार्याध्यक्ष जागेश्वर साखरवाडे, महिला सदस्य गौतमी कांबळे, उपाध्यक्ष विजया वंजारी, जिल्हा सहसरचिटणीस प्रदीप हरडे, नंदकुमार रामटेके, रमेश माने, ग्यानीराम भाजीपाले, कविता पाटील, सुभाष पाटील, गिरेपुंजे आदी सदस्य तसेच प्रशासन अधिकारी हेमराज चौधरी, कनिष्ठ लिपिक गायधने, ढबाले उपस्थित होते.
निवृत्तिवेतन एक तारखेला देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 4:39 AM