शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
2
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
3
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
4
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
5
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
7
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
8
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
9
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
10
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
11
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
12
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
13
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
14
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
15
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
16
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
17
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
18
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
19
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
20
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 

महसूल प्रशासन जनतेसोबत असल्याची ओळख कामामार्फत दाखवा

By admin | Published: August 02, 2015 12:50 AM

महसूल हा शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग आहे. लोकांना जोडण्याचे आणि लोकांच्या सुखदुख:त सहभागी होण्याची संधी या विभागाने ...

महसूल दिन : जिल्हाधिकारी धीरजकुमार यांचे आवाहनभंडारा : महसूल हा शासनाचा अतिशय महत्वाचा विभाग आहे. लोकांना जोडण्याचे आणि लोकांच्या सुखदुख:त सहभागी होण्याची संधी या विभागाने आपल्याला उपलब्ध करुन दिली आहे. या संधीचा योग्य वापर करुन जनतेची कामे तत्परतेने करा आणि महसूल विभाग लोकांच्या सोबत आहे असा संदेश आपल्या कामामार्फत लोकांपर्यंत पोहचवा, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी केले. १ आॅगष्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त सामाजिक न्याय भवनात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांना श्रध्दांजली अर्पित करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, सुजाता गंधे, विजय उरकुडे, जी. जी. जोशी, श्री. गवळी, पुरवठा अधिकारी अनिल बनसोड उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोडे, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, मागील वर्षी आपण काय केले, यावषीर्चे आपले उद्दिष्ट काय आहे, त्यापर्यंत पोहचण्यासाठी आपण काय करणार आहोत, याचे नियोजन करण्याचा हा दिवस आहे. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे मिशन २०२० हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. प्रत्येकाची भूमिका महत्वाची आहे. शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी एका क्षणात सामान्य माणसामध्ये आत्मविश्वास निर्माण करु शकतात. त्याला जगण्याचा आनंद मिळवून देवू शकतात. एक विकसित राष्ट्र होण्यासाठी तळागाळातील माणसाची प्रगती होणे आवश्यक आहे. आपल्या विभागाचे काम अतिशय महत्वाचे असून महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी लोकांसोबत आहेत हा संदेश आपल्या कामातून त्यांच्यापर्यंत गेला पाहिजे. लोकांना भेटून त्यांच्या तक्रारी समजून घेवून त्या सोडवल्या पाहिजेत, असेही ते म्हणाले. आपल्या विभागाची नाळ ही जमिनीशी, मातीशी जोडली गेली आहे. ही नाळ तुटू नये म्हणून सामान्य माणसाची कामे तत्परतेने करायला हवी. लोकांच्या तक्रारी वाढल्यामुळे शासनाला लोकसेवा हमी कायदा आणावा लागला. आता विहित कालावधीत लोकांची कामे केली नाही तर त्यासाठी आपल्याला दंड लागू शकतो, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगिततले. यावेळी लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थ सहाय्य आणि वर्ग-२ च्या जमिनीचे वर्ग-१ मध्ये रुपांतरण दाखले वाटप करण्यात आले. तसेच भंडारा उपविभागातील भंडारा व पवनी येथील गावांचे लोकसहभागातून तयार करण्यात आलेले नकाशे तलाठयांना हस्तांतरीत करण्यात आले. त्याचबरोबर उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे यांनी महाराजस्व अभियान, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महाजन यांनी महाराष्ट्र लोकसेवा हमी कायदा आणि अप्पर कोषागार अधिकारी अर्चना कसबेकर यांनी शासकीय जमा लेखांकन पध्दती (गव्हंर्मेंट रिसिंप्ट आॅकांऊटींग सिस्टीम ) याबाबत पावर पाइंट प्रेझेंटेशनद्वारे माहिती दिली. दरम्यान महसूल दिनानिमित्त सकाळी तहसिल कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार आणि उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोडे, नायब तहसिलदार नावनाथ कातकडे यांनी तसेच इतर ५० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय आणि रॉयल पब्लीक स्कुल येथे वृक्षारोपण करुन हा दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संपत खिलारी यांनी केले. संचालन तहसिलदार सुशांत बनसोडे तर आभार पवनी तहसिलदार पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)