लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्माच्या संयुक्त विद्यमाने भंडारा तालुक्यातील जाख मुजबी येथे यांत्रिक पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिक कृषी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले. गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचे सदस्य डॉक्टर संजय कापुरे यांच्या शेतात यंत्राच्या सहाय्याने मॅटवर तयार केलेल्या १४ दिवसांच्या धानरोपांची यंत्राच्या सहाय्याने लागवडीचे प्रात्यक्षिक उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड व भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी स्वत: धान रोवनी यंत्र चालवून दाखवले.मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी पारंपारिक पद्धतीने धानलागवड करण्याऐवजी शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास एकरी फक्त आठ किलो बियाणे पुरेसे होत असून मजुरांचा खर्च, बियाणे, तणांचे नियंत्रण व नियोजन योग्य प्रकारे होत असल्याने यंत्रचलित धान लागवड फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.उपविभागीय अधिकारी मिलिंद लाड यांनी शेतकऱ्यांना पारंपारिक पद्धतीने धान लागवडीसाठी जवळपास चार हजार रुपये एकरी खर्च येतो तर यांत्रिकीकरणातून फक्त बाराशे रुपयात धान रोवणी होत असून पीकांच्या कीड-रोग व्यवस्थापनासाठी यंत्रचलीत धान लागवड, पट्टापद्धत ही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणारी असल्याचे धान लागवड प्रात्यक्षिकातून सांगितले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना धान रोपांची नर्सरी तयार करण्यापासून ते प्रत्यक्ष यंत्रचलित धान लागवड करण्याविषयी प्रात्यक्षिके दाखवली. यांत्रिक पद्धतीने धान लागवड करण्यास कृषी विभागाने सुरुवात केली असून मजुरांचा खर्च शेतकऱ्यांना परवडत नसल्याने यंत्राच्या सहाय्याने धान लागवड करणे सोयीस्कर ठरत असून शेतकऱ्यांना यांत्रिक पद्धतीने लागवडीचे आवाहन करण्यात येत आहे.सदर प्रात्यक्षिक जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय कृषी अधिकारी मिलिंद लाड, तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी दाखवली. यावेळी तंत्र अधिकारी शांतीलाल गायधने, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सतीश वैरागडे, कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे, खेमा टिचकुले, करुणा उराडे, शेतकरी डॉक्टर संजय एकापूरे, तानाजी गायधने, कवडु शांतलवार , राजेश गायधनी, देवानंद चौधरी, प्रकाश कुकडकर, प्रमोद सेलोकर यांच्यासह परिसरातील शेतकरी यावेळी उपस्थित होते.अपुऱ्या मनुष्यबळासह कीड रोग व्यवस्थापनावर मातऐन हंगामात भेडसावणारा मजूरांचा तुटवडा, कमीत कमी वेळात धान रोवणी, कीडरोग व्यवस्थापन, कमी खर्चात कमी बियाण्यांसह यांत्रिक पद्धतीची धान लागवड फायदेशीर ठरत आहे. प्लास्टिक ट्रे च्या साह्याने १४ ते १६ दिवसांत रोपे लागवडीसाठी तयार होतात. दोन ओळीतील अंतर १८ सेंटीमीटर तर दोन रोपातील अंतर २५ सेंटिमीटर ठेवून लागवड करता येते. रोपातील अंतर योग्य असल्याने तण नियंत्रण करणे सोपे होते. हवा खेळती राहिल्याने करपा, कडाकरपा, खोडकिडा,तुडतुड्याचा प्रादूर्भाव कमी होऊन उत्पादनात भरघोस वाढ होत असून यांत्रिक पद्धतीची धान लागवड शेतकºयांसाठी फायदेशीर आहे.
जाख येथे बांधावर यंत्रचलित भात लागवडीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 5:00 AM
मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी पारंपारिक पद्धतीने धानलागवड करण्याऐवजी शेतकऱ्यांनी यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यास एकरी फक्त आठ किलो बियाणे पुरेसे होत असून मजुरांचा खर्च, बियाणे, तणांचे नियंत्रण व नियोजन योग्य प्रकारे होत असल्याने यंत्रचलित धान लागवड फायदेशीर असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले.
ठळक मुद्देकृषी विभाग व आत्मा यंत्रणेचा उपक्रम : शेतकऱ्यांची वेळेसह मजुरांच्या खर्चात होणार बचत, शेतकऱ्यांचा प्रतिसाद