लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी आवाहनानुसार १९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष सदानंद इलमे यांच्या नेतृत्वात निदर्शने आंदोलन करण्यात आले व निवासी उपजिल्हाधिकारी शैलेन्द्र मेश्राम यांना खालील १४ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, शेतकºयांना सरसकट कर्जमुक्ती द्या, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजवणी करा, धानासाठी आधारभूत किंमत तीन हजार रूपये जाहीर करा, ६० वर्षावरील शेतकरी, शेतमजूर व असंघटीत कामगारांना १० हजार रूपये पेंशन द्या, सिंचनाच्या पुरेशा सोयी उपलब्ध करा, टेकेपार उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडा, लोडशेडिंग बंद करा व शेतीला २४ तास वीज पुरवठा करा, पेट्रोल व डिझेलचे भात कमी करून अर्ध्यावर आणा, एसटी बसची प्रस्तावित भाडेवाढ रद्द करा, वनरक्षक व महसुली कायद्या अंतर्गत जबरान जोतदार व अतिक्रमण धारकांना शेतीचे व घराचे पट्टे द्या तसेच गावठाण व शेतीच्या जागेवरील झुडपी जंगलाचे निर्वणीकरण करा, बेघर व भूमिहीन कुटुंबांना घरे व शेतीसाठी जमीन द्या आणि शहरी व ग्रामीण आवास घरकुल योजनेची अंमलबजावणी करा, गोसीखुर्द प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा वाढीव पॅकेजचा उर्वरित मोबदला मेंढावासीयांना देण्यात यावा, सुरेवाडा ता. भंडारा येथील प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन, नागरी सुविधा व भुखंडाच्या अनियमिततेची चौकशी करून योग्य कार्यवाही करा आदी मागण्यांची दखल घेवून त्याची माहिती पक्षाला देण्यात येईल, असे उपजिल्हाधिकाºयाने सांगितले. या निदर्शने आंदोलनात हिवराज उके, सदानंद इलमे, अरुण पडोळे, माणिकराव कुकउकर, गजानन पाचे, वसंत मुंडले, मोहनलाल शिंगाडे, गोपाल वैद्य, मंगेश माटे, ताराचंद आंबाघरे, दिलीप ढगे, आसाराम वैद्य, महोदव पेशवे, रमेश पंधरे, किसान सुर्यवंशी, देविदास कान्हेकर, प्रकाश उईके, विठोबा बोरसरे, चंद्रकुमार रामटेके, मिताराम उके, अभिमन साखरकर, अर्जून पाचे, गोपाल चोपकर, वामनराव चांदेवार आदी सहभागी होते.
शेतकºयांच्या मागण्यांबाबत भाकप व किसान सभेतर्फे निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 11:40 PM
राज्य किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या देशव्यापी आवाहनानुसार १९ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी भाकपचे जिल्हा सचिव हिवराज उके व....
ठळक मुद्देजिल्हाधिकाºयांना निवेदन : समस्यांकडे वेधले लक्ष