शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

१४७ मतदान केंद्रांवर होणार मतदानाचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 10:34 PM

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मोहाडी तालुक्यातील १४७ मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनवर मतदानाचे प्रात्याक्षिक केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देमोहाडी तहसीलदारांची पत्रपरिषद : मोबाईल व्हॅनमधून होणार मतदान जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्या पूर्वतयारीचा भाग म्हणून मोहाडी तालुक्यातील १४७ मतदान केंद्रावर इव्हीएम मशिनवर मतदानाचे प्रात्याक्षिक केले जाणार असल्याची माहिती तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करण्यात आली आहे. महसूल प्रशासन कामाला लागली आहे. मतदारांमध्ये व्यापक जागृती करण्यासाठी तालुका प्रशासनाने नियोजन केले आहे. मोहाडी तालुक्यातील १४७ मतदान केंद्रावर इव्हीएम व व्हीव्हीपीएटी मशिनवर मतदार प्रात्यक्षिक १ जानेवारी पासून करणार आहेत. २२ जानेवारीपर्यंत मतदानाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम होणार आहे.२२ दिवसात एकूण १०२ प्रात्यक्षिक करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार नवनाथ कातकडे यांनी दिली. इव्हीएम व व्हीव्हीपॅड बाबत जनजागृती गावातील मुख्य चौक नाका, बाजार, शासकीय कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय, सभांची ठिकाणी मतदानाचे प्रात्यक्षिक करून शेवटी मतदानाची मतमोजणी सर्वासमक्ष केली जाणार आहे. मतदान कार्यक्रमाबाबत सर्व राजकीय पक्षांना कळविण्यात आले आहे.राजकीय पक्षांनी या जागृती कार्यक्रमात सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार नवनाथ कातकडे यांनी केले आहे. जनजागृती दरम्यान मतदान करणाऱ्यांचे नाव रेकार्ड करण्यात येईल. तसेच काही समस्या उद्भवतात काय याची माहिती घेवून त्रूाचे निराकरणही केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून मतदान जनजागृती कार्यक्रमासाठी मोबाईल व्हॅन प्राप्त झाली आहे.तसेच मतदान यंत्रे ठेवण्यासाठी तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागात स्ट्राँग रूमची व्यवस्था केली आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅडच्या जनजागृतीची सुरूवात कांद्री, हिवरा, बच्छेरा, वासेरा येथून १ जानेवारीपासून व शेवट २२ जानेवारी रोजी जांभोरा, पालोरा, केसलवाडा, बोरगाव, किसनपूर येथे करण्यात येणार आहे. या जनजागृतीसाठी ३४ कर्मचाºयांचे सहा पथक तयार करण्यात आले आहेत. यात विविध विभागाचे कर्मचारी सहभागी होणार आहेत.