शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

दंत चिकित्सा विभाग नावापुरताच

By admin | Published: January 04, 2016 12:32 AM

येथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागात आवश्यक साधनाचा अभाव तर आहेच, ..

उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे अप-डाऊन सुरुचराहुल भुतांगे तुमसरयेथील सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालयातील दंत चिकित्सा विभागात आवश्यक साधनाचा अभाव तर आहेच, उलट डॉक्टरांचाही पत्ताच लागत नाही. त्यामुळे उपचाराविना रुग्णांना परतावे लागत आहे. रुग्णात कमालीची नाराजी पसरली असून दंत चिकित्सा विभाग हा नावापुरताच आहे काय? असा संतप्त सवाल रुग्णांनी केला आहे.येथील उपजिल्हा रुग्णालयात गत दोन वर्षापुर्वीपासून दंत रोग चिकित्सा विभाग सुरु करण्यात आला. त्यानुसार जाहिरातीद्वारे डेन्टीस्टची भरती प्रक्रिया पार केली होती. तिथेही वरिष्ठांकडे ज्यांचे साठेलोटे जमले त्यानाच नियुक्त करण्यात आले. दरम्यान तुमसर शहरातील अनेक डेन्टिस्टनी अर्ज केले होते. त्यांचा पत्ता लागलाच नाही. नागपूर येथील डॉक्टर रिया जामगाडे यांची नियुक्ती झाली. तेव्हापासून उपजिल्हा रुग्णालयात दंत रोग चिकित्सा विभाग सुरु करण्यात आला. परंतु ओपीडीच्या वेळी दंत रुग्णांना कधीकधीच सुरु दिसतो. बहुतांश वेळा दाराला कुलूपच लागले दिसते. डॉक्टरांची एखाद्या वेळेला गाडी सुटली की दवाखान्याला सुटी राहते, अशी या विभागाची व्यथा आहे. जर का एखादा दंत चिकित्सा विभाग सुरु राहिला तरी दंत रोगाचे रुग्ण ‘केसपेपर’ घेवून गेले असता त्या रुग्णाची मशिनद्वारे योग्य तपासणी करणे आवश्यक असतांना साध्या क्लिनिकप्रमाणे दातांची वरवर तपासणी करुन उपचारासाठी पुढील तारखा देण्यात येतात. किडलेले दात काढणे, दात साफ करणे आदी किरकोळ बाबीकरिता ही पुढील तारखा मिळणे हे समजण्यापलीकडचे आहे. या विभागात ‘अ‍ॅन्टीबायोटिक्स’ च्या गोळ्या वगळता दुसरा कोणताच औषधीसाठा नाही. एक एक्सरे मशीन विभागात असून फारसा उपयोग त्या मशिनचा होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखविला जातो. त्यामुळे या विभागाचा उपयोग तरी काय ? असे रुग्णांचे म्हणणे आहे. याबाबद अनेकदा वरिष्ठांकडे रुग्णांनी तक्रारही केली. पंरतु त्यावर अजूनही कोणतीही सुधारणा झाली नाही. दररोज येणारे दंतरोगाचे रुग्णांना आल्यापावली परतावे लागत असल्याने रुग्णांना शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.