भंडारा : दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत वंचित बहुजन आघाडीने शाहीन बागच्या धर्तीवर भंडारा येथे किसान बाग आंदोलन केले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश खंगार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले.
यावेळी सर्वप्रथम शेतकरी आंदोलनामध्ये शहीद झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्याचा आंदोलनाला पुरजोर पाठिंबा द्यावा, असे आवाहन आंदोलनकर्त्यांनी केले. या आंदोलनामध्ये अनेक संघटनांनी सहभाग दर्शवला तसेच नागरिकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जमात-ए-इस्मालियाचे अध्यक्ष सादिक हुसेन, शकील चव्हाण, मंजिलेभाई, भरारी फाऊंडेशनच्या ॲड. सुजाता वाडेकर, समता सैनिक दलचे राष्ट्रीय महासचिव एम. आर. राऊत, डॉ. भैयालाल गजभिये, राजकुमार चिमणकर, कुंदलता ऊके, भानारकर, सूर्यभान हुमने, वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद गोस्वामी, लाखांदूर तालुकाध्यक्ष प्रकाश नाकतोडे, जिल्हा प्रवक्ता शिलमंजू सिंहगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
या आंदोलनात वंचितचे जिल्हा उपाध्यक्ष राधेश्याम कावळे, महासचिव दिगांबर रामटेके, धनपाल गडपायले, भंडारा शहराध्यक्ष सोमेंद्र शहारे, लाखनी तालुकाध्यक्ष दीपक जनबंधू, अतुल नागदेवे, विजय रंगारी, सोहेल खान, संजय धकाते, मोरेश्वर मेश्राम, उषा जांभूळकर, सरिता टेंभुर्णे, नरेंद्र बंसोड, महावीर घोडेस्वार, भीमराव खोब्रागडे, दिलीप दहिवले, रूपा मेश्राम, शीतल रामटेके, शीला कानेकर, अमित वैद्य, बी. एस. चौरे, अमर राऊत, सुधीर खोब्रागडे, डॉ. विवेक मोगरे, जगदीश रंगारी, यादोराव गणवीर, एस. एम. बोरकर, कार्तिक तिरपुडे यांनी सहभाग घेतला. सूत्रसंचालन लाखनीचे तालुकाध्यक्ष दीपक जनबंधू यांनी केले तर जिल्हा महासचिव दिगांबर रामटेके यांनी आभार मानले.