पाणीपुरवठा विभागाचे अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झालेत तर काहींचे निधन झाले आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा विभागाद्वारे वेळेवर पेन्शन दिली जात नाही. अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर दिले जातात. स्वर्गवासी झालेले कर्मचारी जे. व्ही. मुळे, नारद वासनिक, मोरेश्वर मेश्राम, एच. एस. पटले, टी. जी. रांहागडाले यांचे कुटुंबांना वेळेवर पेन्शन मिळत नसल्याचे वास्तव आहे. त्यांच्या कुटुंबीयांपुढे प्रपंच कसा करावा हा प्रश्न आहे. गेल्या चार महिन्यापासून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळाली नसल्याने मानसिक विवंचनेत काही सेवानिवृत्त कर्मचारी जीवन जगत आहेत. प्रत्येकाची हक्काची पेन्शन दर महिन्याला वेळेवर देण्यात यावी अशी मागणी एन. एस. खोब्रागडे, जी. के .लांडगे ,एम .झेड. गोंडाणे, एफ. जी. रांहागडाले , पी. एम. नंदेश्वर, के. ऐ. भेंडारकर यांनी केली आहे.
पाणीपुरवठा कर्मचारी पेन्शनपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:26 AM