लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली. एसटीची चाके धावायला लागली. आजही अनेकांच्या मनात कोरोनाची धास्ती आहे. परंतु सर्वसामान्यांना बाहेरगावी जाण्यासाठी एसटी बसशिवाय पर्याय नाही. सर्व नियमांचे पालन करून एसटीचा प्रवास सुरू असल्याचे लोकमतने केलेल्या रियालिटी चेकमध्ये दिसून आले.नागपूर-तुमसर बस नागपुरहून सकाळी ११.३० वाजता सुटली. वाहकाने सर्वप्रथम सर्वप्रवाशांना मास्क लावण्याची सूचना दिली. वाहकाने आपल्या जवळील सॅनिटायझर काढून दोन्ही हाताला लावले. त्यानंतर तिकीटांचे बुकींग केले. तिकडे चालकही मास्क लावून बस चालवित होता. ३२ प्रवाशांपैकी बहुतांश सर्वांनी मास्क लावले होते. परंतु काही प्रवाशांच्या मास्क हनुटीवर दिसत होते. चालकाने दीड तासाच्या प्रवासात दोन ते तीन दा मास्कबाबत सूचना दिल्या. सोशल डिस्टन्सिंगचे मात्र पालन होत नव्हते. प्रवासी अगदी जवळजवळ बसल्याचे दिसून येत होते. काहीही झाले तरी सर्वसामान्यांना एसटी बसच्या प्रवासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच मनात कितीही शंका असली तरी प्रवास करावाच लागतो.
एक तासाच्या प्रवासात किती वेळ तोंडावर मास्क चालकबस सुरू करण्यापुर्वी चालकाने हात सॅनिटाईज करून तोंडावर मास्क लावला. मात्र कधी मधी तो मास्क वरखाली करताना दिसत होता.वाहकवाहकाने पूर्णवेळ मास्क लावल्याचे दिसत होते. सर्व प्रवाशांच्या तिकीटा काढल्यावर हात सॅनिटाईज करून तो कॅबिनमधील चालकाच्या बाजूला जावून बसला. प्रवासादरम्यान पूर्णवेळ मास्क लावून तो इतर प्रवाशांनाही सूचना देता होता.