लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील मोहरणा रेतीघाटातील रेतीउपसामुळे मोहरणावासी त्रस्त झाले. ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी मिळून रेतीउपसावर बंदी घालीत ट्रक अडवून धरले होते. 'आधी रस्ते दुरुस्त करा, मगच रेती उपसा करा' या मागणीकडे अखेर प्रशासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा गावकºयांच्या विरोधात रेतीउपसा सुरू असला तरी विरोध खदखदतच आहे.लाखांदूर तालुक्याला वैनगंगा व चुलबंद नदीची मोठी देणं आहे. नैसर्गीक साधन संपत्तीने समृद्ध हा तालुका मात्र रेतीघाटाच्या लिलावामुळे विकासाच्या अगदी विरुद्ध जात असतानाचे चित्र मागील अनेक वर्षांपासून बघायला मिळत आहे. अनेकदा विरली, इटान, गावराळा, मोहरणा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकºयांनी अनेकदा आंदोलने केली, निवेदने दिली, परंतु प्रशासनापुढे काही एक न एकूण घेतल्याने संपूर्ण चौरास भागातील लाखो रुपये खर्चून तयार केलेले नवीन कोरे रस्ते दोन दिवसात खड्डेमय झाले. गवराळा वासीयांनी तर तीव्र आंदोलन केले असता न्याय मिळू शकला नाही. यंदा पुन्हा मोहरणा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकºयांनी रेती उपसा व वाहतुकीविरुद्ध एल्गार पुकारला. चक्क ओव्हरलोड रेती भरलेले ट्रक अडवून धरले. रेती उपसावर बंदी घातली. आधी ग्रामपंचायत अंतर्गत सर्व खराब झालेले रस्ते दुरुस्त करून द्या, नंतरच रेतीघाट सुरू करा ही प्रमुख मागणी जोर धरू लागली. अन संपूर्ण गाव एक झाला. लहान मुले, महिला, पुरुष रस्त्यावर उतरले. तहसीलदारांना निवेदन सादर केले. परंतु काही एक अर्थे झाला नाही, लगेच दुसºया दिवसांपासून गावकºयांच्या विरोधात रेतीघाट सुरू झाला. मात्र गावकºयांमध्ये तीव्र रोष अजूनही खदखदत आहे.मोहरणा रेतीघाट शासनाची तिजोरी भरण्यासाठी फायद्याची असली तरी मोहरणावासीयांसाठी मात्र धोक्याची घंटा ठरत आहे. रेतीघाट कंत्राटदाराने चक्क शासकीय जागेवर रेतीसाठा केला. शतकोटी वृक्ष लागवड केलेल्या जागेवर रेतीसाठा केल्याने हजारो झाडे रेतीखाली दबली. अलिकडेच ग्रामपंचायतने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार केलेला स्मशानभूमीचा रस्ता उखडला. मुख्य रस्ता ओव्हरलोड रेतीच्या ट्रकांमूळे पूर्णत: खराब झाला. विद्याार्थ्याचे अपघातामुळे शाळेत ये - जा बंद झाले.सीमांकनाच्या बाहेरची रेती उपसा होऊ लागली. हे सर्व बघून गावकºयाचा राग अनावर झाला. तहसीलदार लाखांदूर यांना निवेदन सादर करून रेतीघाट बंद करण्याची मागणी केली होती.जिल्हा खनिकर्म,महसूल विभाग गप्प का?लाखांदूर तालुक्यातील मोहरणा रेतीघाटातील रेतीउपसामुळे मोहरणावासी त्रस्त झाले असताना, ओव्हरलोड रेती वाहून नेली जात आहे. सीमांकणाच्या बाहेरील रेतीचा उपसा होत असताना अहोरात्र रेतीचा उपसा होत आहे. तरीही जिल्हा खनिकर्म/महसूल विभाग गप्प का? असा प्रश्न गावकºयांपुढे निर्माण झाला आहे. गावातीलच ट्रॅक्टरधारकांवर कारवाईचा बडगा दाखविणारे आता गप्प का? असा प्रश्न विचारल्या जात आहे.
मोहरणावासीयांच्या विरोधानंतरही रेतीचा उपसा राजरोसपणे सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 10:07 PM
तालुक्यातील मोहरणा रेतीघाटातील रेतीउपसामुळे मोहरणावासी त्रस्त झाले.
ठळक मुद्देशासकीय जागेवर रेतीचा साठा : रेतीच्या साठ्याखाली दबली झाडे