देवानंद नंदेश्वर
भंडारा : महागाई वाढली असून, त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करताना अडचण येत आहे, असे आरोप वारंवार होतात. दुसरीकडे मात्र तळीरामांना कशाचीच चिंता नाही. वाढत्या महागाईतही वर्षभरात जिल्ह्यातील तळीरामांनी ६६ लाख ०१ हजार ८४५ लिटर देशी-विदेशी दारू व बीअर पोटात रिचवली.
दारूच्या एकूणच व्यवहारातून राज्य शासनाच्या महसुलात जिल्ह्याने ४ कोटी ३० लाख रुपये जमा केले आहेत. जिल्ह्यात देशी दारू उत्पादन कारखाना नाही. बीअर ९ लाख ७४ हजार १६४४ लिटर, विदेशी दारू १८ लाख ०३ हजार २९२, तर देशी दारू ३८ लाख २४ हजार ३८९ लिटर दारू विक्री करण्यात आली आहे. यातून शासनाला ४ कोटी ३० लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे.