लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : सुटलेला वादळी वारा. ढगांचा आवाज अन् अंधारात लकाकणारी वीज. शिवारात बांधलेली जनावरे. अशातच झाडावर वीज कोसळली. क्षणात तडफडत-तडफडत एका बैलाचा व म्हशीचा मृत्यू झाला. खरीप हंगामात औत ओढण्यासाठी आसूसलेल्या शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. असा हा दुर्देवी प्रकार रोहणा येथे रात्री घडला.रोहिणी व मृगाच्या जोडनक्षत्राचा योग जुळला. वादळी वाºयासह पाऊस झाला. मेघांची गर्जना रात्री होत होती. लखलखणारी ती वीज कुठेतरी काही उद्ध्वस्त करुन गेली असेल असा अंदाज येत होता. अनेकांचा तो अंदाज खरा ठरला. रोहणा या गावशेजारी बेटाळा रस्त्यावरच्या शिवारात नेहमीप्रमाणे पुरुषोत्तम पंचबुध्दे यांनी जनावरे बांधलेली होती. निबांच्या झाडाला एक बैल तर दुसरा बैल औताला बांधला होता. शेजारीच म्हशीचा पिल्लू (वघार) बांधलेली होती. जनावरांना पाणी पाजले. खायला वैरण देवून पुरुषोत्तम घरी आले. पण, रात्री वीजेने डाव साधला. निंबाच्या झाडावर वीज कोसळली. त्यात झाडाला बांधलेला एक बैल व शेजारी असलेली म्हशीचा तो मोठा झालेला बछडा जागीच तडफडून मृत झाला. औता बांधलेल्या बैलाने झटका दिला. बांधलेला दावा तुटला व तो पळण्यास यशस्वी ठरला. तरीही तो काहीसा जखमी झाला. वीजेच्या लख्ख प्रकाशाने त्या बैलाचे डोळे पणती कमजोर झाली. त्या बैलाला दिसत नसल्याचे सांगण्यात आले. वैरण अन् पाणी देवून आलेला पुरुषोत्तम निवांतपणे झोपला. सकाळी उठून तो शिवाराकडे गेला. झाडाखाली मृत पडलेली जनावरे बघून तो स्तब्धच राहिला. त्याने डोक्यावर हात मांडत आलेल्या संकटाची परिक्षाच बघीतली. या घटनेची खबर मिळताच रोहणाचे सरपंच नरेश ईश्वरकर, ग्रा. पं. सदस्य देवचंद सेलोकर, नितेश मारवाडे, संदीप बोंदरे यांनी घटनास्थळ गाठले.घटनेची माहिती सरपंच नरेश ईश्वरकर यांनी तहसीलदार सुर्यकांत पाटील, ठाणेदार मोहाडी, तलाठी यांना दिली. शासनाकडून योग्य ती मदत मिळण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर एका बैलाचा मृत्यू व दुसरा जखमी झाल्याने पुरुषोत्तम पंचबुध्दे आर्थिक संकटात सापडला आहे. बाजारात बैलाच्या जोडीची किंमत ५० हजारावर आहे.नैसर्गिक आपत्तीमध्ये जनावरांचा मृत्यू झाल्यास शासनाकडून मदत दिली जाईल. घटनेचा अहवाल प्राप्त होताच तातडीने धनादेशाने आर्थिक मदतीचा हात दिला जाईल.- सूर्यकांत पाटीलतहसीलदार, मोहाडी
खरीप हंगामाच्या प्रारंभीच नियतीने डाव मोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 08, 2018 11:31 PM
सुटलेला वादळी वारा. ढगांचा आवाज अन् अंधारात लकाकणारी वीज. शिवारात बांधलेली जनावरे. अशातच झाडावर वीज कोसळली. क्षणात तडफडत-तडफडत एका बैलाचा व म्हशीचा मृत्यू झाला. खरीप हंगामात औत ओढण्यासाठी आसूसलेल्या शेतकºयांवर आर्थिक संकट कोसळले आहे. असा हा दुर्देवी प्रकार रोहणा येथे रात्री घडला.
ठळक मुद्देवीज कोसळल्याने बैल ठार : ५० हजाराचे नुकसान, शेतकऱ्यावर संकट