नियमबाह्य पद्धतीने बळजबरीने सार्वजनिक ठिकाणातील ग्रामपंचायत मालमत्तांचे नुकसान केले आहे. त्यात येथील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा हातपंप व साहित्याची नासधूस करून हे साहित्य घरी काढून ठेवत येथील नागरिकांना भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवल्याचा डाव समोर आला आहे. याविषयी ग्रा. पं. कार्यालयाच्यावतीने रितसर पत्रव्यवहार करण्यात आला होता. सदर ग्रा. पं. कर्मचारी पत्रव्यवहार करण्यास त्याच्या घरी गेले असता, ग्रा. पं. कर्मचारी व सरपंच, उपसरपंच, सदस्यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचे खंडविकास अधिकारी व पोलिसांना देण्यात आलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
याप्रकरणी १५ दिवसांचा कालावधी लोटला असला, तरी तक्रार देऊनही आंधळगाव पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याप्रकरणी सार्वजनिक ठिकाणातील शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करून रितसर कारवाई करण्याची मागणी सरपंच, सचिव, उपसरपंच व सदस्यांनी केली आहे.