शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

प्राचीन बौद्धस्तुपाचा विकास होणे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे

By admin | Published: January 23, 2017 12:24 AM

शहराच्या आजूबाजूला करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन बौद्धकालीन वस्तू व ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे बौद्धस्तुप आढळून आहेत.

पवनी : शहराच्या आजूबाजूला करण्यात आलेल्या उत्खननात प्राचीन बौद्धकालीन वस्तू व ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे बौद्धस्तुप आढळून आहेत. त्यामुळे पवनी शहर हे पूर्वी बौद्ध धर्माचे मोठे केंद्र असल्याचे मानले जाते. जर या बौद्ध स्तुपाचा बुद्धगया, सारनाथ आदींच्या धर्तीवर पर्यटनदृष्ट्या विकास केल्यास पवनी शहराचे आंतरराष्टूीय स्तरावर नाव येवून पर्यटनाची नवी दालने उघडली जातील व पवनीचे अच्छे दिन यायला वेळ लागणार नाही.त्यामुळे पर्यटनाशी संबंधीत नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. शहर व तालुक्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मागील दोन वर्षात वेगाने वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटक वाढण्याकरिता व पर्यटनस्थळांचा विकास करण्याकरिता शासनस्तरावर नियोजन झाल्यास पर्यटनदृष्ट्या पवनी शहराचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. शहरात होत असलेल्या खोदकामात अजूनही प्राचीन वस्तू सापडत आहेत. उत्खननात बुद्धकालीन वस्तू, स्तूप सापडले आहेत. शहराजवय जगन्नाथ टेकडी, चांडकापूर टेकडी, हरदोलाल टेकडी येथे पुरातत्व विभाग व नागपूर विद्यापीठाने ४४ वर्षापूर्वी केलेल्या उत्खननात तीन बौद्धस्तूप मिळाले आहेत. तसेच मोठ्या संख्येने बौद्धकालीन वस्तू मिळालेल्या आहेत. त्यामुळे येथे प्राचीन काळी बौद्ध धर्माचे फार मोठे केंद्र असल्याचे मानले गेले आहे. पवनी येथील उत्खननात सापडलेल्या अनेक मूर्ती, वस्तू आजही मुंबई, दिल्ली, गया आदी शहरातील प्राचीन वस्तू संग्रहालयात आहेत. या वस्तू पवनीच्या प्राचीनतेची ओळख राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर देत आहेत. शहराजवळ मिळालेल्या प्राचीन बौद्धस्तुपाचा पुरातत्व पर्यटन विभागाने विकास केल्यास पर्यटनदृष्ट्या व बौद्ध धर्माच्या दृष्ट्या पवनी शहर हे आंतराष्ट्रीय स्तरावर येण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल ठरणार आहे. यासोबतच येथे प्राचीन ऐतिहासीक वस्तूंचे वस्तू संग्रहालय होण्याची आवश्यकता आहे. हे वस्तू संग्रहालय पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. येथे पर्यटन वाढण्याकरिता भरपूर वाव आहे. (शहर प्रतिनिधी)