लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भंडारा- गोंदिया क्षेत्रात विकास खुंटलेला आहे. विकास हा नागपूरमध्ये झाला आहे. तो विकास भंडारा - गोंदिया जिल्ह्यात दोन वर्षांत येईल. या विकासात विरोधकांचा सहभाग राहिल, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.लाखनी येथे सृष्टी नेचर क्लबच्या वतीने आयोजित रावण दहन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी खासदार नाना पटोले, आमदार बाळा काशिवार, जि. प. सभापती विनायक बुरडे, जि.प. सदस्य आकाश कोरे, अध्यक्ष दत्ता गिºहेपुंजे, उपाध्यक्ष विनोद भुते, प्रशांत खेडीकर, अर्पित गुप्ता, परवेज आकबानी आदी उपस्थित होते. खासदार पटोले म्हणाले, अदानी, व्हिडिओकॉनसारखे कारखाने असूनही त्याचा फायदा जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना झाला नाही. भेलचे सर्व अडथळे दूर करण्यात यश आले आहे. त्याची फलश्रुती दिसेलच. नोटबंदी व जीएसटीमुळे मंदीचे सावट आहे. जीएसटीमुळे व्यापार मंदावले आहेत. पेट्रोल ३५ ते ४० रुपयांच्या दराने उपलब्ध व्हायला पाहिजे, परंतु सरकारने पेट्रोलचे दर ८० रुपये प्रति लिटर करून सामान्य नागरिकांची कंबर मोडली आहे. येत्या अधिवेशनात जीएसटी व पेट्रोलमुळे मिळणाºया कराचा उपयोग किती प्रमाणात नागरिकांना होतो, ते हिवाळी अधिवेशनात विचारणार आहोत. गोसे खुर्दचे पाणी पोहचविण्याचा मानस आहे. भंडारा- गोंदिया जिल्ह्यात येत्या काळात राम राज्य येणार असल्याचे ते बोलायला विसरले नाही. पटोले यांच्या भाषणातील विरोधी सूर जिल्ह्यात मात्र चर्चेचा विषय ठरला.
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा विकास खुंटलेलाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 10:32 PM
भंडारा- गोंदिया क्षेत्रात विकास खुंटलेला आहे. विकास हा नागपूरमध्ये झाला आहे. तो विकास भंडारा - गोंदिया जिल्ह्यात दोन वर्षांत येईल.
ठळक मुद्देनाना पटोले : दसरा उत्सवात विरोधी सूर