लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा जिल्ह्याला खेळाची चांगली परंपरा असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक खेळाडू भंडारा जिल्ह्यात निर्माण झाले आहे. खेळाच्या तुलनेत मैदानाची अवस्था फारशी समाधानकारक नसून खेळाचे उत्तम वातावरण तयार करण्यासाठी उत्तम सुविधाही आवश्यक आहे. मैदानाची देखभाल व देखरेख केवळ अधिकाºयांचे काम नसून क्रीडा संघटना व खेळाडू यांच्या सहकार्याने क्रीडा संकुलाचा विकास करण्यात येईल. आवश्यक निधी शासन तसेच सी.एस. मार्फत उभारण्यात येईल, असे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सांगितले.भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे आज संकुलाच्या सोयी सुविधा व अन्य समस्यांबाबत संघटनांच्या पदाधिकाºयांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, नगराध्यक्ष सुनिल मेंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, शिक्षणाधिकारी बी.एल. थोरात व क्रीडा संघटनेचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.
लोकसहभागातून होणार क्रीडा संकुलाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2017 10:54 PM