लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यातील ४० टक्के कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून दोन वर्षात शिल्लक कामे पूर्ण केली जातील. राज्य सरकारची कामगिरी अभूतपूर्व असून मागील तीन वर्षात राज्याचा विकासदर वाढला आहे, असा दावा भाजपचे प्रवक्ता माधव भंडारी यांनी केला.राज्य सरकारच्या तीन वर्षांच्या कामगिरीचा आढावा सांगण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. भाजप सरकारने तीन वर्षात भरीव कामे केल्याचे सांगत माधव भंडारी म्हणाले, राज्यात कृषी विकास दर वाढलेला आहे. ३१ नोव्हेंबर २०१४ रोजी कृषी विकास दर उणे ११.२ टक्के होता. यावर्षी त्यात २४ टक्क्यांनी वाढ झाली असून १२.५ टक्क्क्यांवर पोहोचला आहे.राज्य सरकारने तीन वर्षात कृषी क्षेत्रात ५६ हजार कोटींची गुंतवणूक केली. सिंचनातही भरीव कामगिरी केली असून कृषीपंपाचा अनुषेश दूर करण्यात आला आहे. १ लाख ३८ हजार नवीन कृषीपंप देण्यात आले आहे. त्यामुळे शेती उत्पादनात वाढ झाली आहे.कृषी उत्त्पन्न बाजार समितींमध्ये शेतकºयांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. राज्यात ५ हजार नवीन तलाठी साझा तयार करण्यात आले असून जमिनीची ई-मोजणी केली जाणार आहे. गटशेतीला प्रोत्साहन देण्यात आले असून शेतमालावर आधारित प्रक्रिया उद्योग निर्माण केल्याचे त्यांनी सांगितले.जलयुक्त शिवार योजना महत्त्वाकांक्षीमुुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात आली. या योजनेतून शेतकरी स्वयंपूर्ण करणे हाच सरकारचा उद्देश आहे. भंडारा जिल्ह्यात जलयुक्त शिवार या योजनेसाठी २०१ गावांची निवड करून १७१ गावांमध्ये काम करण्यात आले होते. त्यातून आतापर्यंत ७१ हजार ३९२ हेक्टर नवीन सिंचन क्षमता निर्माण करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष तारीक कुरैशी, आमदार चरण वाघमारे, आमदार बाळा काशिवार, आ.गिरीश व्यास, चंदन गोस्वामी, भंडाºयाचे नगराध्यक्ष सुनील मेंढे, मुकेश थानथराटे, राजेश बांते उपस्थित होते.
राज्याचा विकासदर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 11:28 PM
राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारने अनेक भरीव कामे केली आहेत.
ठळक मुद्देमाधव भंडारी : त्रिवर्षपूर्तीनिमित्त पत्रपरिषद