लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : समाजातील तरूणाई शिक्षण क्षेत्रात फार मागे आहे. जन्मदात्या आईवडिलाचे प्रती मुलांनी आपले कर्तव्य पार पाडावे. आईच्या कुशीत जीवन सार्थ होते. गरीबांच्या गरजांचा शोध घेऊन सहकार्य करावे, समाजाचे मातीचे सोने करावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तीन तत्व शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा. परिणामी संघटीत समाजाद्वारे समाजाचे किंबहुना गावांचा विकास संभव होईल, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.तेली समाज पंच कमेटीद्वारे परसोडी येथे नवनिर्मित संत जगनाडे सभागृहाचे उद्घाटन प्रसंगी उर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार चरणभाऊ वाघमारे हे होते. यावेळी सत्कारमुर्ती नागपुरचे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती टेकचंद सावरकर, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नागपूरचे जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, भंडारा वकील संघाचे माजी अध्यक्ष किशोर लांजेवार, जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर, तेली समाज पंचकमेटीचे अध्यक्ष मारोतराव हटवार, उपाध्यक्ष बंडू हटवार, सचिव प्रेमसागर वैरागडे, सहसचिव रघुपती फंदे, कोषाध्यक्ष सुधाराम हटवार, सरपंच पंकज सुखदेवे, उपसरपंच दर्शन फंदे, विष्णु वंजारी, शालिकराम हटवार, जागेश्वर वंजारी, ग्रामपंचयत परसोडीचे सर्व सदस्य गण, महात्मा गांधी तंमुस अध्यक्ष मोहन डोरले, माजी समाज कल्याण सभापती राजकपूर राऊत उपस्थित होते.आमदार चरण वाघमारे तेली समाजाला संबोधित करताना म्हणाले की स्पर्धा युग आहे. याकरिता शिक्षण महत्वाचे आहे. गरजेनुसार शिक्षण ग्रहण करावे, एकत्रित येऊन तेली समाजाचा विकास कसा करता येईल व यासाठी स्पर्धा परीक्षा कौशल्य केंद्र गावात लवकर कार्यान्वीत करण्यासाठी जागृकतेने कार्य करावे. टेकचंद सावरकर म्हणाले की, चालीस वर्षापासून अल्प निधीद्वारे समाजाची सेवा सुरू केली. आज वटवृक्षासारखे फुलते. यांची समाज बांधवांनी योग्यरितीने लाभ घ्यावा याकरिता मारोतराव हटवार सारखा विद्यार्थी सेवा समाजाप्रती करावी. त्याचप्रमाणे आजच्या तरूण वर्गाने समाजासाठी सेवा करावी.बंडू सावरबांधे म्हणाले समाजाचा विकास करावयाचा असेल तर बौद्ध धम्माचे स्विकारले जनतेप्रमाणे एक संघ होईल आपला व आपल्या समाजाचा विकास करावा इतर धर्मांवर टिका टिप्पणी न करता समाजातील तरूणाईने शेतीसोबत शिक्षणही महत्वाचे आहे. उच्च विद्याविभुषीत होऊ तेली व इतर समाजाची सेवा करावी.यावेळी जिल्हा परिषद सदस्य चंद्रप्रकाश दुरूगकर, माजी समाजकल्याण सभापती राजकपूर राऊत, सरपंच पंकज सुखदेवे यांची भाषणे झाली. तत्पुर्वी तेली समाज पंचकमेटीद्वारे नवनिर्मित संत जगनाडे महाराज सभागृहाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुडे यांच्या हस्ते करण्यात आले. सायंकाळी महाप्रसाद वितरित करण्यात आले. प्रास्ताविक मारोतराव हटवार यांनी केले. संचालन पोलीस पाटील दौलत वंजारी यांनी केले. आभार आशिष हटवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तेलीपंच कमेटी पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत परसोडी, तंटामुक्त गाव समिती पदाधिकारी सदस्य, महिला मंडळ, ज्येष्ठ नागरिक यांनी सहकार्य केले.
संघटित समाजाद्वारे गावांचा विकास संभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 10:01 PM
समाजातील तरूणाई शिक्षण क्षेत्रात फार मागे आहे. जन्मदात्या आईवडिलाचे प्रती मुलांनी आपले कर्तव्य पार पाडावे. आईच्या कुशीत जीवन सार्थ होते. गरीबांच्या गरजांचा शोध घेऊन सहकार्य करावे, समाजाचे मातीचे सोने करावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तीन तत्व शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा.
ठळक मुद्देसंत जगनाडे सभागृह : चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन