यावेळी सरपंच रंजना वाटगुरे, उपसरपंच दयाराम लंजे आणि सदस्य उपस्थित होते. झाशीनगर येथील सिमेंट रस्त्याचे सरपंच आशा गदवार, उपसरपंच रवींद्र नाईक यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले. येलोडी येथे स्मशानभूमी रस्ता खडीकरण, तिडका येथे सिमेंट रस्ता, पवनी धाबे येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा स्मारकाजवळ सभामंडप आणि आ.वि.वी. सहकारी संस्थेसमोर सिमेंट रस्ता, धाबेटकडी येथे स्मशानभूमी सिमेंट रस्ता, कान्होली येथे सिमेंट रस्ता भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. या दरम्यान, येलोडी येथील स्व. सुकराम कांबळे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी यशवंत गणवीर, रतिराम राणे, दीनदयाल डोंगरवार, आर. के. जांभुलकर, अविनाश रहिले, संजय ईश्वर, सरपंच संजय खरवडे, पपिता नंदेश्वर, उपसरपंच पराग कापगते, आ.वि.वी. सेवा संस्था अध्यक्ष रघुनाथ कुरसुंगे, तेजराम राऊत, तुलसीदास कोडापे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
गोठणगाव क्षेत्रात विकासकामांना सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 02, 2021 5:15 AM