वीज कंपनीचे पूर्ववत राष्ट्रीयीकरण करण्यात यावे, ठेकेदारी पद्धत बंद करावी, स्थिर आकार, वहन आकार, इंधन समायोजन, मीटर भाडे, इतर आकार घेणे बंद करावे, फक्त वीज वापरचे बिल देण्यात यावे, इतर राज्याप्रमाणे २०० युनिटपर्यंत मोफत वीज देण्यात यावी, कोळसा येथील, पाणी येथील, मजूर येथील, जागा येथील, प्रदूषण येथे परंतु अदानी वीजनिर्मिती केंद्राची वीज गुजरातमार्गे पाकिस्तानला देणे बंद करून भंडारा-गोंदिया जिल्ह्यात २४ तास अविरत वीजपुरवठा करण्यात यावा, अदानी वीजनिर्मिती केंद्राकडून धापेवाडा उपसा सिंचन, बावनथडी प्रकल्पामधून होणारी पाण्याची चोरी थांबविण्यात येऊन ते पाणी शेतकऱ्यांना देण्यात यावे, वीज वितरण कंपनीकडून ग्राहकांवर लावण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावे, आदी मागण्यांसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मागण्यांचे निवेदन वीज अभियंत्यांना देण्यात आले. डॉ. सुनील चवळे, नितीन लिल्हारे, तुकाराम बांते, जागेश्वर मेश्राम, वसंता कस्तुरे आदी वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 4:24 AM