शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
3
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
4
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
5
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
7
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
8
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
9
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
10
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
11
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
12
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
13
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
14
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
15
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
16
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
17
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
18
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
19
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
20
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा

धानाला सडका वास

By admin | Published: October 06, 2016 12:53 AM

धानाचे कोठार असलेल्या आपल्या जिल्ह्याला मागील १५ दिवसांपासून अस्मानी संकटाने घेरले आहे.

धानाचे कोठार संकटात : शेतकरी घाबरला, पाऊस थांबणे गरजेचेपालांदूर : धानाचे कोठार असलेल्या आपल्या जिल्ह्याला मागील १५ दिवसांपासून अस्मानी संकटाने घेरले आहे. हलके व माध्यम धान कापणीला आले असून काही ठिकाणी कापणी केलेले धान सडत आहे. तर काही ठिकाणी हवा व पाऊसाचा जोरदार झोताने धान भुईसपाट झाले. सततच्या पावसाने बांधातील पाणी निघत नसल्याने पडलेल्या धानाचा सडका वास येत आहे तर कित्येक शेतकरी पडलेला धान उभा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत.मागील तीन वर्षाचा ओला, कोरडा दुष्काळ, डोक्यावर घेत हिम्मतीने नव्या हंगामाला शेतकरी नव्या उर्जेने तयार होते. मात्र निसर्ग लहरी झाल्याने अनियमितपणा वाढला आहे. जुन महिन्यात पाऊसाची अत्यल्प हजेरीने पेरणी अर्धी व लांबली जुलै महिन्यात समाधानकारक पण कही खुशी कही गम करीत हजेरी लावली. आॅगस्टला ताण देत निंदन वाढला. धान कमी पण निंदण जास्त, अशी स्थिती झाली. सप्टेंबरला पहिला, दुसरा हपत्यात कमी जासत हजेरी लावीत महिनाअखेरपर्यंत जबरदस्त हजेरी लावली. दिवसभर ढगाळ हवामानामुळे किडीचा उपद्रव वाढला. कापणीच्या धानाला तुळतुळा, अळी, करपा यांचा त्रास वाढल्याने नियंत्रणाकरीता खर्च वाढला. कृषी विभाग जेमतेम एखादेवेळेस अनुदानावर औषधी पुरवितात ही नियमित करून खर्च कमी करण्याची आवश्यकता आहे. करपा रोगात नविन प्रश्न तयार झाला असून निसवलेली लोंबी अक्षरक्ष: पांढरी होतात. दाणे भरतच नाही बऱ्याच शेतात गळ्याजवळील दाणे पोचटच असतात, असे रोग नवीन असल्याने सामान्य शेतकऱ्याला कळणारे नसल्याने नुकसान होत आहे.लाखनी तालुक्यातील चुलबंधच्या खोऱ्यातील धानशेती पावसाने प्रभावित झाली असून लोहारा, नरव्हा, मऱ्हेगाव, वाकल, खराशी, पाथरी शिवारात धान कापले असून सततच्या पावसाने सडत आहेत. पाणी बांधातून पूर्णपणे निघत नसल्याने मोठी अडचण शेतकऱ्यासमोर उभी झालेली आहे. पंजाबराव कृषी विद्यापिठ अंतर्गत साकोली कार्यालयातून डॉ. उषा डोंगरवार व्हॉटसअ‍ॅपवरून माहिती पुरवित ५ आॅक्टोंबरपर्यंत पावसाचा अंदाज असून धान कापणी न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.शासन-प्रशासनाने पिकविमा उतरविण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्यात नैसर्गीक आपत्ती आल्यास लाभ मिळणार म्हटले होते. पंधरादिवसापासून भंडारा जिल्ह्यात रोगराई व पावसाच्या कहराने धानपिक नुकसानग्रस्त झाले आहे. ते पाहण्याकरीता विमा कंपनी किंवा अधिनस्त कर्मचारी फिरकले नाही. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून सावरण्याची गरज आहे. (वार्ताहर)