शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

धापेवाडाचे पाणी पोहोचणार करडीत

By admin | Published: March 29, 2017 12:44 AM

करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. त्यासाठी सुरेवाडा व करचखेडा उपसा सिंचन योजनेला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

पालोरा येथे पत्रपरिषद : नाना पटोले यांची माहितीकरडी (पालोरा) : करडी परिसर कोरडवाहू क्षेत्रात मोडतो. त्यासाठी सुरेवाडा व करचखेडा उपसा सिंचन योजनेला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. काही कारणांमुळे योजना पूर्ण होण्यास विलंब होत आहे. सुरेवाडा उपसा सिंचन योजनेचा ब्ल्यूप्रिंट तयार आहे. बरीच कामेही झाली आहेत. धापेवाडा टप्पा क्रमांक २ चे पाणी चोरखमारा व अन्य जलाशयात करडी परिसरातील शेतीला सिंचनासाठी आणली जाईल. त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती खा. नाना पटोले यांनी दिलीे. पालोरा येथे आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते. धापेवाडा टप्पा क्रमांक दोन मधून गर्रा, बोदलकसा, चोरखमारा आदी जलाशयात पाणी सोडले जाईल. तलावांच्या माध्यमातून शेती सिंचनाखाली आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. त्यामुळे सिंचनाचा समस्या सन २०१९ पर्यंत दूर होईल. केंद्र सरकारने बजेटमध्ये शेतीवर आधारित उद्योगनिर्मितीवर भर दिला आहे. उद्योगांचे माध्यमातून रोजगाराचा प्रश्न सोडविला जाणार आहे. शेती व शेतकऱ्यांची उन्नती त्यातून साध्य होणार आहे. वैनगंगा नदीवरील पुलासाठी प्रशासकीय व तांत्रिक मजुरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे मोहाडी तालुक्यातील दोन्ही भाग आपसात जोडले जाणार असून नागरिकांसाठी पुल उपयोगी ठरणार आहे. १६ व १२ तासांच्या भारनियमन प्रश्नावर पटोले म्हणाले, माझी लढाई मी माझ्या बरोबरच्या लोकांबरोबर करतो. लहानांसोबत करीत नाही. लहान भावाने लहानासारखेच वागले पाहिजे. करडी प्रकरणी त्यांनी शौचालयासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. ज्यांना अगोदर लाभ मिळाला असेल, मात्र त्यांचेकडील शौचालयाची अवस्था खराब असेल, अशा सर्वांना १२ हजार रूपयांचा लाभ रोजगार हमी योजनेतून दिला जाईल, दुरूस्तीनुसार लाभ दिली जाणार नाही. परंतु ज्यांचेकडे पक्के बांधकाम आहे. त्यांना लाभ मिळणार नाही. मोहफुलाला वनोपज वाहतुक परवान्यातून मुक्त करण्यात आले. टॅक्समुक्तीवरही विचार सुरू आहे.सन २०१९ पर्यंत घरकुलांचा प्रश्न सोडविला जाणार आहे. कोणालाही घरापासून वंचित ठेवला जाणार नाही. पक्षपात व भेदभाव केला जाणार नाही. बीपीएल, एपीएल अशा भेदभाव न करता गरवंत हीच कसोटी राहणार आहे. त्यामुळे गरजवंताना प्राधान्य देण्यासाठी सर्वांच्या पुढाकाराची आवश्यकता आहे, परंतु गरिबांच्या आड कुणी येत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही. मग ते कुणीही असोत, जिल्हा परिषद सदस्यता सरिता चौरागडे यांचा अपात्रतेचा प्रश्न सुटलेला आहे. आता त्या जि.प. सदस्या आहेत. त्यांचे प्रकरणी गैरसमज ठेवण्याची आवश्यकता नाही. अन्न सुरक्षा योजनेमुळे कुणीही गरीब उपाशी राहणार नाही. ही योजना आरक्षण मुक्त करण्यात आली आहे. भेदभाव संपुष्टात आणण्यात आला आहे. परंतु त्यातही लाभार्थी हा गरजवंत असणे आवश्यक आहे. पत्रपरिषदेला जि.प. सदस्या सरिता चौरागडे, माजी जि.प. सदस्य के.बी. चौरागडे, पं.स. सदस्य महादेव बुरडे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष निशिकांत इलमे, छावा संग्रामचे तालुकाध्यक्ष उमेश तुमसरे, जांभाराचे माजी सरपंच जगदिश गोबाडे, मोहगावचे उपसरपंच अशोक शेंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर)