भंडारा येथील जिल्हा सामान्या रुग्णालयात अद्ययावत सर्व सोयींनी युक्त रुग्णवाहिकेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. आमदार भोंडेकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून धर्मशाळेसाठी ५० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. टप्प्याटप्प्याने या भव्य अशा धर्मशाळेकरिता शासनाकडून निधी उपलब्ध देण्याचे आश्वासन दिले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला रुग्णालयाच्या कामाची पाहणी त्यांनी केली. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर लगेच दुसऱ्या टप्प्यातील कामाकरिता ४० कोटी रुपयांचा निधी शासनाकडे पाठपुरावा करून उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा व उपजिल्हा रुग्णालय, पवनी येथे अद्ययावत सर्व सोयींनी युक्त कार्डियाक रुग्णावाहिकेचे लोकार्पण आमदार भोंडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. भंडारा व पवनी येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी विभागातर्फे देण्यात येणाऱ्या खावटी वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी अनिल गायधने, सुरेश धुर्वे, सतीश तुरकर, मोईन शेख, दिनेश गजभे, आशा गायधने, सविता तुरकर, आशिष चवडे, शालिनी नागदेवे, तर पवनी येथील कार्यक्रमात तालुकाप्रमुख विजय काटेखाये, बाळू फुलबांधे, आशिष माटे, प्रशांत भुते, जितेश इखार, अनिल धकाते, नामदेव सुरकर, सुधाकर साठवणे, नरेश बावनकर गणेश मुंडाले, देवराज बावनकर आदी उपस्थित होते.