लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :देशात अतापर्यंत जे समाज सत्तेपासून, अधिकारापासून वंचित ठेवल्या गेले त्या सर्व समाजाने एकत्रित येऊन सत्ता हातात घ्यावी व आपले अधिकार मिळवावे, यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.येथील इंद्रलोक सभागृहात वंचित बहुजन आघाडीचे वतीने वंचित बहुजन समाजाच्या पुढारींसोबत आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते.यावेळी सभेला माजी आमदार मोरे, आमदार लक्ष्मण माने, माजी आमदार हरिभाऊ भदे, भारिप बहुजन महासंघ प्रदेश महासचिव सागर डबरासे, हलबा समाजाचे नेते खुशाल निमजे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिशुपाल भुरे, सुरेश मते, एल.के. मडावी, शांताराम निनावे, मंगलमूर्ती सोनकुसरे, संजय हेडाऊ, जिल्हा महिला अध्यक्ष वृंदा उके यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, सत्ताधारी लोक देशातील मूलभूत प्रश्नावरून लक्ष विचलीत करण्याकरिता देशात दंगे घडवून आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. त्याचाच ऐक भाग म्हणून दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रतीचे पन्ने जाळण्यात आले. पण आम्ही त्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही असा इशारा अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला. संचालन माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे तर प्रास्ताविक भाषण भारिप बहुजन महासंघाचे जिल्हा अध्यक्ष रंजीत कोल्हटकर यांनी केले. आभार विद्यार्थी नेत्या सानिया डोंगरे यांनी मानले.
वंचितांनी अधिकार मिळविण्यासाठी एकत्र यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 9:43 PM
देशात अतापर्यंत जे समाज सत्तेपासून, अधिकारापासून वंचित ठेवल्या गेले त्या सर्व समाजाने एकत्रित येऊन सत्ता हातात घ्यावी व आपले अधिकार मिळवावे, यासाठीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय नेते अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : भंडारा येथे भारिप बहुजन महासंघाची सभा