अवकाळी पाऊस, गारा पडल्याने धानाचे होणारे नुकसान अशा अनेक समस्यांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागताे. तरीसुद्धा शेतकरी न डगमगता शेती कसत आहे. शेतीची मशागत, पीक लागवड, बी-बियाणे, रोवणीपासून कापणीपर्यंत पैसा खर्च करावा लागताे. सध्या डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टरचे प्रति तासाचे मशागतीचे भाडेही वाढले आहे. मागील वर्षीपेक्षा डिझेलच्या दरात तब्बल २० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे ट्रॅक्टरच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटाधत सापडल्याचे दिसून येते.
बॉक्स
शेतीसाठी लागणारी बियाणे, खते व अन्य खर्चात वाढ झाली असली तरी शेतकऱ्याला शेती करावीच लागेल. शेतकरी शेती वाऱ्यावर साेडेल तर खाणार काय? बियाणे व खतांच्या वाढलेल्या किमती कशाप्रकारे कमी करता येईल यासाठी शासनाने प्रयत्न करावेत. तसेच राेहयाेच्या माध्यमातून कामे केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच फायदा हाेईल.