विद्यार्थी वाहतूक शुल्क : मध्यमवर्गीयांचे बजेट कोलमडलेभंडारा : काही दिवसांपूर्वी डिझेलच्या किंमतीत एक रुपयाने वाढ होताच प्रत्येक वस्तूच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली होती. याचा परिणाम मध्यमवर्गीयांच्या बजेटवर झाला होता. एसटी व रेल्वेने तिकीटाचे दर डिझेलच्या किमतीशी सुसंगत करण्यासाठी पावले उचलतात. याचाच अर्थ डिझेलचे दर घटताच एसटी व रेल्वेचे भाडेही कमी होणार आहे. नित्योपयोगी वस्तूंच्या बाबतीतही किमती कमी होणार असल्याचे चिन्ह दिसू लागले आहेत. तशा बातम्याही प्रसिध्द झाल्या आहेत. मात्र सद्य:स्थितीत डिझेलच्या भावात घट झाली असताना स्कूल बसचे, शाळेच्या आॅटो रिक्शाचे भाडे कमी होणे अपेक्षित होते. पंरतु तसे होताना दिसत नाही. विद्यार्थी वाहतुकीचे दर शाळांनी कमी न केल्याने पालकवर्गात असंतोष आहे. डिझेल भाववाढीचा परिणाम आम्हाला ताबडतोब दिसतो, पंरतु दर कमी झाल्याचा परिणाम दिसून येत नाही, अशी पालकांची ओरड आहे. (जिल्हा प्रतिनिधी)दर कमी करण्याबाबत शाळा गप्प का?ज्या शाळा स्कूलबसची सोय उपलब्ध करुन देतात ते शाळा प्रवेशाच्या वेळीच याची फी वसूल करतात. काही ठिकाणी एका वर्षाचे तर काही ठिकाणी सहामाही, तिमाही भाडे शाळा संचालकांकडून वसूल केले जाते. मागीलवर्षी वाढलेल्या डिझेलच्या किंमतीमुळे जादाची फी वसूल करण्यात आली होती. त्यामागे डिझेलचे भाव वाढल्याने हे शुल्क वाढविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. आता मात्र चारवेळा डिझेलच्या किंमती कमी झाल्या असल्या तरी देखील प्रवास शुल्कात कपात करण्याची साधी बाब कुणी समोर आणत नसल्याचे दिसते. काही पालकांच्या मते एकदा घेतलेल्या फी मधील रक्कम परत देण्याची तरतूद शाळांनी करायला हवी. दर कमी करण्याबाबत शाळा संचालक मात्र गप्प बसले आहेत.
डिझेलचे दर घटले मात्र वाहतूक शुल्क ‘जैसे थे’
By admin | Published: December 25, 2014 11:26 PM